World's Happiest Countries : आनंदी आनंद गडे! जगातल्या आनंदी देशांच्या यादीत या देशांचा समावेश

आशिया खंडातील एकही देश आनंदी नाही?
World's Happiest Countries
World's Happiest Countriesesakal
Updated on

World's Happiest Countries 2023: दरवर्षी 20 मार्च रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय आनंदी दिन साजरा केला जातो. जगभरातील लोकांच्या जीवनात आनंद पसरवणे हा त्याचा उद्देश होता. या दिवशी जगात सर्वात जास्त आनंदी असलेल्या देशांची यादी जाहीर केली जाते.

या यादीत पहिला नंबर हा फिनलंडचा लागाला आहे. तर, टॉप २० मध्ये आशिया खंडातील एकही देश आनंदी नसल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

World's Happiest Countries
Hindu Temple : शंकराच्या मंदिराबाहेर नंदी आणि कासव का असतात?

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने 2013 मध्ये हा उपक्रम सुरू केला. या यादीत सलग सहा वर्षे अव्वल स्थानी असलेला फिनलंड देश आहे. केवळ 5.5 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या या देशाने हॅपीनेसच्या क्रमवारीमध्ये 7.842 गुण मिळवले आहेत.

फिनलँडमधील लोक नेहमीच आनंदी
फिनलँडमधील लोक नेहमीच आनंदीesakal
World's Happiest Countries
Ayodhya Temple : जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात अयोध्या राम मंदिराचे काम पूर्ण होईल - स्वामी गोविंददेवगिरी महाराज

कसं ठरवंल जातं

देश आनंदी आहे की नाही हे ठरवण्यासाठी रँकिंग दिले जाते. एखादा देश किती आनंदी आहे हे त्याचे जीडीपी, जीवनमान आणि लोकांचे आयुर्मान यावरून ठरवले जाते. युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने जाहीर केलेल्या क्रमवारीत 150 देशांचा समावेश आहे.

डेन्मार्कमध्ये  निसर्ग सौंदर्य अफाट आहे
डेन्मार्कमध्ये निसर्ग सौंदर्य अफाट आहेesakal
World's Happiest Countries
YIN Cabinet Tour : यिन मंत्रिमंडळाच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरवात

ही रँकिंग 2019 नंतर प्रथमच जाहीर करण्यात आली आहे. 2023 हॅपीनेस रँकिंग 2020, 2021 आणि 2022 च्या मूल्यमापनावर आधारित आहे.

आइसलँडमध्ये तूम्हाला स्वर्ग अनुभूती येईल
आइसलँडमध्ये तूम्हाला स्वर्ग अनुभूती येईलesakal
World's Happiest Countries
IRCTC Thailand Tour : अशी संधी पुन्हा येणे नाही; 50 हजारात फिरा थायलंड, बँकॉक, पटाया अन् बरंच काही!

आनंदाच्या क्रमवारीत फिनलंड पुन्हा एकदा अव्वल क्रमांकावर आहे. त्यात दुसऱ्या क्रमांकावर डेन्मार्क आणि तिसऱ्या क्रमांकावर आइसलँड आहे. हे देश पर्यटनाच्या दृष्टीने खूप श्रीमंत आहेत आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात.

World's Happiest Countries
Farmer Study Tour : कृषी तंत्रज्ञानाचा आविष्काराचा शेतकऱ्यांना अनुभव; आधुनिक शेतीबद्दल माहिती

या यादीत इस्रायलला चौथे तर नेदरलँड पाचव्या क्रमांकावर आहे. इस्रायलसाठी ही मोठी झेप आहे कारण गेल्या वेळी तो 9व्या क्रमांकावर होता.

धनंजय मानेंचा परशा ज्या इस्त्राईलला गेलेला त्याच देशाचा चौैथा नंबर लागलाय
धनंजय मानेंचा परशा ज्या इस्त्राईलला गेलेला त्याच देशाचा चौैथा नंबर लागलायesakal
World's Happiest Countries
PM Modi Mumbai Tour : मोदींच्या भाषणातील प्रमुख ११ मुद्दे

या क्रमवारीत स्वीडन सहाव्या, नॉर्वे सातव्या, स्वित्झर्लंड आठव्या, लक्झेंबर्ग नवव्या आणि न्यूझीलंड दहाव्या क्रमांकावर आहे. यापैकी एकही आशियाई देश नाही. या यादीत अमेरिका १५व्या तर ब्रिटन १९व्या क्रमांकावर आहे.

नेदरलँड हा सुंदर, समृद्ध आणि सुखी देश आहे
नेदरलँड हा सुंदर, समृद्ध आणि सुखी देश आहेesakal
World's Happiest Countries
Nashik Tourism : पर्यटनाचे ‘फेव्हरिट डेस्टिनेशन’ नाशिक

या सर्व देशांचा समावेश या क्रमवारीत होण्याला एक महत्त्वाची गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे पर्यटन क्षेत्र. या सर्वच देशात असलेले निसर्ग सौंदर्य, तिथली स्वच्छता, पर्यटन विकास या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

World's Happiest Countries
Foreign Tour : कमी पैशांत फॉरेन ट्रीप करायचीय? बघा ही ठिकाणं

आशिया खंडातील देशांनीही त्यांच्या स्वच्छता, पर्यटन विकासावर भर दिला पाहिजे. कारण, पर्यटक जास्त आले तरच देशात नवे पैसे येतील. आणि विकासाला चालना मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.