Worlds Tallest Shiva Statue : जगातील सर्वात उंच भगवान शंकरांची मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

आपल्या देशाला देवांचा देश म्हटले जाते
Worlds Tallest Shiva Statue
Worlds Tallest Shiva Statue esakal
Updated on

आपल्या देशाला देवांचा देश म्हटले जाते. त्याचे मुख्य कारण म्हणजे देशात असलेली मंदिरांची आणि भोळ्या भक्तांची संख्या होय. या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. भारत सरकार आजकाल धर्मप्रसार करण्यावर अधिक भर देत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे 'विश्वास स्वरूपम' ही भगवान शंकरांची सर्वात उंच मूर्ती होय. राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात ही शिवाची सर्वात उंच निर्माण करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण काल (२९ ऑक्टोबर) करण्यात आले.

Worlds Tallest Shiva Statue
Tallest Statues | जगातील सर्वात उंच मुर्त्यांसमोर इमारतीही खुज्या वाटतात

राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारामध्ये बांधलेल्या या शिवप्रतिमेची उंची 369 फूट आहे. या मूर्तीला जगातील टॉप-5 उंच मूर्तींमध्ये स्थान मिळाले आहे. भगवान शंकरांची ही सर्वात मोठी मूर्ती असून ती ध्यान धारणेत बसलेल्या शंकरांच्या रूपातील आहे. संत कृपा सनातन संस्थेने तयार केलेली ही मूर्ती बनवण्यासाठी 10 वर्षे लागली आहेत.नाथद्वाराच्या गणेश टेकडीवर बांधलेली ही मूर्ती ५१ एकराच्या डोंगरावर पसरलेली आहे. ही मूर्ती एवढी मजबूत आहे की, तासी 250 कि.मी वारे सुटले तरी या मूर्तीला धक्का लागणार नाही.

Worlds Tallest Shiva Statue
Lord Shiva Temples: महाराष्ट्रातील 12 प्रसिद्ध शिव मंदिरे

ही मूर्ती अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. यामध्ये लिफ्ट, जिने आणि हॉलची सुविधा आहे. मूर्तीच्या टॉपला जाण्यासाठी चार लिफ्ट आणि तीन जिने आहेत. पुतळ्याच्या बांधकामात 3000 टन स्टील, लोखंड, 2.5 लाख टन काँक्रीट आणि वाळू वापरण्यात आली आहे.

Worlds Tallest Shiva Statue
WhatsApp Status : चुकीची कमेंट केल्यामुळे वरातीत गोळीबार; चाकू हल्ला

या मूर्तीच्या आत एकावेळी 10 हजार पर्यटक जाऊ शकतात. असे सांगितले जात आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी तूम्हाला 4 तासांचा कालावधी लागू शकतो. यामध्ये लहान मुलांसाठी गेमिंग झोन, म्युझिकल कारंजे, बंजी जंपिंग, खाद्यपदार्थांसाठी फूड कोर्ट, फोटो शौकिनांसाठी सेल्फी पॉइंट्स बनवण्यात आले आहेत.

Worlds Tallest Shiva Statue
Statue Of Equality : 120 किलो सोन्याची मूर्ती आणि 1 हजार कोटी रुपये खर्चून उभा राहणार मंदिर

विश्वास स्वरूपम्’ला कसे पोहोचावे

मुलांच्या दिवाळी सुट्टी अजूनही सुरू आहेत. त्यामुळे लगेचच प्लॅन करणार असाल तर ‘विश्वास स्वरूपम्’ बेस्ट ऑप्शन आहे. येथे पोहोचण्यासाठी जवळचे विमानतळ हे जेके विमानतळ राजसमंद असून जवळचे रेल्वे स्टेशन नाथद्वारा हे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.