सध्या पावसाचं वातावरण आहे, सगळीकडे हिरवळ पसरली आहे, डोंगर, दऱ्या, धबधबे आणि धुक्यामुळे वातावरण एकदम ओक्के झालं आहे. यातंच पावसात फिरायला जाण्याचा बेत म्हणजे एक प्रकारची मेजवानीच म्हणावी लागेल. पण फिरायला गेल्यावर मजा म्हणजे काय असते हो?
फक्त डोंगर, दऱ्या, धबधबे आणि पावसात भिजणं म्हणजे मजा किंवा आनंद आहे का? तर नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे मग ती वेळ कोणतीही असो. असाच फिरायला गेलेल्या तरूणांच्या झिंगाट डान्सचा व्हिडीओ एका वर्षापूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे.
(Young Boys Dance On Truck Horn Viral Video)
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फिरायला गेलेल्या तरूणांचा एक ग्रुप रस्त्यावरील एका ट्रकच्या हॉर्नच्या आवाजावर झिंगाट होऊन नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये काही जण नागीन डान्स करत आहेत तर काहीजण रस्त्यावर लोळून नाचत आहेत. तर काहीजण मोर डान्स करत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे.
घाट रस्त्यावरील एका मालवाहू गाडीच्या हॉर्नच्या आवाजावर ते नाचत आहेत पण भर रस्तात अशा प्रकारचं धाडस करण धोक्याचं ठरू शकतं. पावसाळ्यात घाट रस्त्यावरून गाड्या घसरण्याचं आणि दरड कोसळण्याचं प्रमाण अधिक असतं पण असं धाडस करताना आधी विचार करायला हवा.
पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काळू वॉटरफॉल येथे फिरायला गेलेले पर्यटक पूराच्या पाण्यामुळे अडकून पडल्याचा प्रकार मागच्या रविवारी घडला होता. तर अनेक हुल्लडबाज पर्यटकांना आपल्या मस्तीमुळे जीव गमवावा लागतो. पण अशी मस्ती करताना इतर पर्यटकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.