दहा तास नुसतं खात राहिली २४ वर्षीय तरुणी; लाइव्ह स्ट्रीमिंगमध्ये झाला मृत्यू, पोटात जे सापडलं ते ऐकून व्हाल थक्क

Influencer dies on livestream : सध्या आपण सोशल मीडियावर असंख्य फूड ब्लॉगर्स पाहतो. त्यांनी शेअर केलेले फूड व्हिडिओ देखील आपण अनेकदा पाहिले असतील,
24-year-old girl dies during livestream from overeating stomach found full of undigested food
24-year-old girl dies during livestream from overeating stomach found full of undigested food
Updated on

सध्या आपण सोशल मीडियावर असंख्य फूड ब्लॉगर्स पाहतो. त्यांनी शेअर केलेले फूड व्हिडिओ देखील आपण अनेकदा पाहिले असतील, ज्यामध्ये फूड प्रेमी भरपूर अन्न पदार्थ खातात आणि नवीन रेकॉर्ड तयार करताना दिसतात. पण चीनमध्ये अशाच एका चॅलेंजमध्ये एका 24 वर्षीय तरुणीचा अति खाल्ल्यामुळे मृत्यू झाला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असताना घडली. ही तरूणी तब्बल 10 तास सतत अन्न खात राहिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती इतकी खालावली की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

चीनमधील स्थानिक पोर्टल हनक्यूंगच्या रिपोर्टनुसार, ही दुःखद घटना 14 जुलै रोजी घडली होती. त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, पॅन शियाओटिंग (Xiaoting) नावाची मुलगी फूडी होती आणि ती अनेकदा जास्त अन्न खाण्याचे चॅलेंज स्वीकारत असे. अशा चॅलेंजमध्ये 10 तासांपेक्षा जास्त वेळ सतत खाणे याचा देखील समावेश होता.

Creaders.com या स्थानिक चीनी पोर्टलनुसार, Xiaoting एका वेळी 10 किलो अन्न खात असे. तिने असं करू नये यासाठी तिचे आई-वडिलांनी आणि मित्र असा सल्ला देत असत. पण, तिने असे चॅलेंज घेणे थांबवले नाही. अशाच एका घटनेत अति खाल्ल्याने अखेर तिचा मृत्यू झाला.

24-year-old girl dies during livestream from overeating stomach found full of undigested food
Sharad Pawar : "राजकारणातला सर्वात मोठा भ्रष्टाचाराचा सरदार शरद पवार"; पुण्यातून अमित शहांचा पवारांवर निशाणा

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उलगडलं रहस्य

पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये Xiaoting मृत्यूचे रहस्य उघड झाले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले की तिचे पोट खूप फुगले होते आणि त्यात पूर्णपणे न पचलेले अन्न आढळले. रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आलं की, या मुलीने अन्न चावण्याएवजी ते थेट पोटात ढकलले.

दरम्यान Xiaoting च्या मृत्यूने सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. फूड ब्लॉगर्सच्या अशा चॅलेंज घेण्यावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक क्रिएटर्स आहेत जे एका ठराविक वेळात अन्नाचं मोठं ताट संपवण्याचे चॅलेंज स्वीकारतात.

24-year-old girl dies during livestream from overeating stomach found full of undigested food
Prank Gone Wrong : हे अति होतंय... सोशल मीडियावरली 'प्रँक'ची कॉपी करणं भोवलं! ११ वर्षांच्या चिमुरड्याचा रिलने घेतला जीव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.