प्रत्येक कंपनीची स्वत:ची काही धोरणे, नियम असतात. हे नियम कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त असावी, यासाठी केले जातात. अनेकदा कर्मचारी काही नियम धाब्यावर बसवतात कारण काही नियम कर्मचाऱ्यांना जाचक वाटतात.
सध्या नियंमावरुन नोकरी घालवल्याचं एक प्रकरण चर्चेचा विषय आहे. एका महिला कर्मचारी लंचब्रेकला बाहेर गेली आणि चक्क तिला नोकरीवरुन काढण्यात आलं. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलयं (a company fired from job as a employee took lunch break viral new)
ब्रिटनमधल्या वेस्ट मिडलँड्समधल्या डुडले इथं 'लीन एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट कंपनीतील हे प्रकरण आहे. तेथील कर्मचाऱ्याने वर्क टाईममध्ये जेवणाचा ब्रेक घेतल्यानं कामावरून काढून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेसी शेरवूड असं या महिला कर्मचाऱ्याचं नाव आहे.
वर्क टाईमध्ये तिने लंच ब्रेक घेतला आणि सोबत दोन सहकाऱ्यांसोबत ती बाहेर गेली. मात्र हा लंच ब्रेक तिला चांगलाच महागात पडला. नियम मोडल्यामुळे तिला कंपनीने चक्क कामावरुन काढून टाकले. ही घटना 2018मध्ये घडली होती.
क्षुल्लक कारणामुळे कामावरुन काढून टाकणे, हे तिला सहन झालं नाही. तिला टार्गेट करून निलंबित करण्यात आलं, असं ट्रेसीचं म्हणणं होतं. संतापलेल्या ट्रेसीनं शेवटी हे प्रकरण न्यायालयात नेलं. यावर कंपनीने कामाच्या बाबतीत ट्रेसी प्रामाणिक नसायची असा आरोप केला मात्र तरीही न्यायालयाने ट्रेसीच्या बाजूनं निकाल दिला
कंपनीने ट्रेसीला 12 लाख रुपयांची भरपाईही द्यावी असे न्यायालयात सांगण्यात आले. त्याप्रमाणे ट्रेसीला कंपनीने नुकसान भरपाई म्हणून 12 लाख रुपये दिले. सध्या या प्रकरणाची सर्वत्र आहे. सोशल मीडियावर अनेकजण कंपनीविरुद्ध रोष व्यक्त करत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.