एअर इंडियाचे दिल्लीहून अमेरिकेला जाणारे विमान तांत्रिक बिघाडामुळे रशियाकडे वळवण्यात आलं. एअर इंडियाच्या या पराक्रमामुळं प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्रवाशांनी एअर इंडियावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे आणि त्यांना कोणतीही मदत मिळत नसल्याची तक्रार केली आहे. परंतु टाटा समूहाचा एक भाग बनलेल्या या कंपनीने रशियामध्ये प्रवाशांची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचे म्हटलं आहे.
एअर इंडियाचे विमान AI-183 गुरुवारी संध्याकाळी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला गेले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते रशियाच्या क्रास्नोयार्स्क आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. 225 प्रवाशांना घेऊन जाणारे बोईंग 777 रशियन विमानतळावर सुरक्षित उतरले.
या घटनेनंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, सर्व प्रवशांना लवकरात लवकर अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. पण रशियन विमानतळावर त्यांच्याकडे कोणताही कर्मचारी नाही, त्यामुळे तेथे अडकलेल्या प्रवाशांसाठी त्यांना थर्ड पार्टीची मदत घ्यावी लागणार आहे. अशी माहिती कंपनीनं ट्विटरद्वारे दिली आहे.
मात्र कंपनीने दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. केव्ही कृष्णा राव या ट्विटर युजरने कंपनी विरोधात ट्विट करत, म्हटले आहे की, आम्हाला येथे कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आम्ही विमानतळावर अडकलो आहोत. आमच्याकडे अन्न नाही. आम्हाला कोणतेही अपडेट्स दिले जात नाहीत.
तसेच, रशियात अडकलेल्या प्रवाशांसाठी पाणी आणि जेवणाची कोणतीही व्यवस्था नसल्याचे प्राची जैन यांनी सांगितले. पाच तासांपासून प्रवासी पाणी आणि अन्नाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसात भिजल्यामुळे त्यांना थंडी वाजत असल्याचे माझे पालक सांगतात. ते भुकेले असून त्यांना विचारणारे कोणी नाही असही जैन यांनी म्हटलं आहे.
मात्र, प्रवाशांनी केलाला दावा कंपनीनं फेटाळून लावला आहे. विमान कंपनीला प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची काळजी आहे आणि त्या लोकांना लवकरात लवकर तेथून बाहेर काढण्याची व्यवस्था केली जात आहे. याबाबतचे अपडेट्स लवकरच शेअर केले जातील. असं कंपनीनं पुन्हा एकदा सांगितलं आहे.
वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाडामुळे एक दिवस रशियात अडकले होते. त्यानंतर रशियाच्या दुर्गम मगदान विमानतळावर प्रवाशांसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.