Maharashtra Politics : 'सबसे पहले मैं ही आया', 'कोणीतरी महाराष्ट्र पॉलिटिक्स समजवा'.. अजित पवारांच्या बंडानंतर मीम्स व्हायरल

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सचा पाऊस सुरू झाला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticseSakal
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणात आज पुन्हा एक मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतली आहे.

यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून, महाराष्ट्रातील लोकांची दुपारची झोप उडाली आहे. यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मीम्सचा (Ajit Pawar Memes) पाऊस सुरू झाला आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे एखाद्या वेब सीरीजपेक्षा मनोरंजक असल्याचं मत नेटीझन्स व्यक्त करत आहेत. (Maharashtra Politics)

महाराष्ट्राचं राजकारण मला कोणीतरी समजवा, अशा आशयाचे मीम्स सध्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.

अजित पवारांनी घेतलेली पहाटेची शपथ, शिवसेनेमधील बंड, उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळणं, आणि आता अजित पवारांनी पुन्हा घेतलेली शपथ यामुळे महाराष्ट्राचं राजकारण अगदीच रंजक आणि गुंतागुंतीचं झालं आहे.

काही दिवसांपूर्वीच पटनामध्ये विरोधी पक्षांची बैठक झाली होती. या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. मात्र, आज त्यांनाच मोठा धक्का बसला आहे.

अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा रेफरन्स घेऊन, सबसे पहले मैं ही आया असाही मीम एका ट्विटर यूजरने तयार केला आहे.

राज्यातील या पक्षांच्या सरमिसळीमुळे नेमका कोणता नेता कुणासोबत आहे याबाबत सामान्यांचा मोठा गोंधळ उडाला आहे.

उठा उठा! महाराष्ट्राच्या राजकारणाचा तिसरा सीझन सुरू झालाय..

हे आणि असे बऱ्याच प्रकारचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या या शपथविधीचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात आता कसे उमटतात ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Maharashtra Politics
Ajit Pawar : 'मी अजित पवार दृढ कथन करतो की....' उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.