Sunetra Pawar
Sunetra Pawaresakala

Sunetra Pawar Biography : अजितदादा जेवढे राजकारणात तेवढ्या सुनेत्रा पवार समाजकारणात खंबीर

अजित पवार राजकारणात जेवढे सक्रीय आहेत तेवढ्याच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या समजकारणात खंबीर आहेत
Published on

Sunetra Pawar : अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी काही वेळापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी बंड केल्यानं राज्यात नवं राजकीय समीकरण तयार झालं. त्यानुसार, अजित पवार यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुसऱ्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरुन राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.

यावेळी राजभवनात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार हजर होत्या. अजित पवार राजकारणात जेवढे सक्रीय आहेत तेवढ्याच त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या समजकारणात खंबीर आहेत.

सुनेत्रा अजित पवार या स्वतःमध्ये एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हार्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या संस्थापक सुनेत्रा पवार, भारतातील इको-व्हिलेजची संकल्पना रुजवण्यात मार्गदर्शक होत्या. भारत ही खेड्यांची भूमी असल्याने, ती स्वतःमध्ये एक क्रांती आहे.

विद्या प्रतिष्ठान या स्वदेशी आणि सुप्रसिद्ध शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त म्हणून त्या काम करतात. 2011 पासून त्या फ्रान्समधील जागतिक उद्योजकता (World Entrepreneurship Forum) मंचाच्या थिंक टँक सदस्य आहे.

सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या हिमतीच्या बळावर पर्यावरणविषयक जागरूकता केंद्रस्थानी आणण्यासाठी व ती देशभरात पसरवण्यासाठी त्यांच्या एनजीओ, एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया (EFOI) द्वारे जागतिक स्तरावर नेण्यासाठी एक ताकद निर्माण केली. त्यासाठी त्यांना "ग्रीन वॉरियर अवॉर्ड"ने सन्मानित देखील करण्यात आले.

सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम (स्वच्छ गाव) मोहिमेवर स्वयं-सहायता गट चळवळीचे नेतृत्व केले. 2008 मध्ये काटेवाडी गावाचे "मॉडेल व्हिलेज" आणि पहिले इको-व्हिलेज मध्ये रूपांतर त्यांनी केले, ज्यामध्ये स्वच्छता आणि आरोग्य, सामुदायिक पशुधन व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया यांना प्रोत्साहन दिले.

Sunetra Pawar
Sunetra Pawar

त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना भारताच्या राष्ट्रपती श्रीमती. प्रतिभाताई पाटील, तसेच सार्कचा भाग असलेल्या SACOSAN शिखर परिषदेतूकडून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार, सायबर ग्राम पुरस्कार आणि माननीय निर्मल ग्राम पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले. अशा प्रकारे, सेंद्रिय शेती आणि बायोएजंट, गांडूळ खत आणि हिरवळीचे खत वापरण्यास प्रोत्साहित करण्यास त्यांची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Sunetra Pawar
Sunetra Pawar Exclusive : Ajit Pawar यांची ‘ती’ सवय जी सुनेत्रा पवारांना आवडत नाही

2006 पासून, श्रीमती सुनेत्रा पवार यांनी बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क लिमिटेडच्या अध्यक्षा म्हणून काम केले आहे, केंद्र सरकारच्या एकात्मिक टेक्सटाईल पार्क्सच्या योजनेंतर्गत एक मल्टिमॉडल गारमेंट उत्पादक पार्क आहे. जे महिला सक्षमीकरण आणि प्रशिक्षण सुविधा प्रदान करते. (Ajit Pawar)

टेक्सटाईल पार्कमध्ये 15,000 हून अधिक महिला काम करतात, ज्यापैकी बहुतांश महिला ग्रामीण भागात राहतात. बारामतीत महिलांना रोजगार मिळवून देण्यात सुनेत्रा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना "आयकॉन्स ऑफ पुणे" पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. बारामतीच्या महिलांचा हक्काचा आधार असेही सुनेत्रा यांना म्हटले जाते. (Maharashtra Politics)

Sunetra Pawar
Ajit Pawar : अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत का केलं बंड? 'हे' आहे कारण? | Maharashtra Politics

बारामतीच नव्हे तर विविध जिल्ह्यातून आलेल्या गरजू रुग्णांवर गेल्या तीन वर्षात मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रीया करण्याचे महत्वाचे काम सुनेत्रा पवार यांनी केले. प्रारंभी ज्येष्ठ नागरिक निवासाच्या माध्यमातून व त्या नंतर एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडीया या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जवळपास तीन हजारांवर शस्त्रक्रीया करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.