अॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश करून १० वर्षे पूर्ण झाली आहे. ई-कॉमर्सच्या क्षेत्रातल्या टॉप साईट्सपैकी एक असलेल्या अॅमेझॉनने २०१३ साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि गेल्या १० दिवसांमध्ये लोकांची शॉपिंगची पद्धतच बदलली.
अॅमेझॉनने ५ जून २०१३ मध्ये भारतामध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये या साईटवरुन अगदी मर्यादित प्रॉडक्ट्स विकले जात होते. पण कालांतराने यामध्ये वाढ झाली. भारतामध्ये कोणत्या वस्तू विकल्या जातील, याबद्दल या कंपनीने अभ्यास केला. भरपूर वेळ घेऊन अॅमेझॉनने भारतीय बाजारपेठ लक्षात घेतली आणि त्यानंतर इथे आपला विस्तार केला. आज अॅमेझॉननवरुन तुम्ही किराणा मालापासून ते मोठमोठे टीव्ही फ्रीजही खरेदी करू शकता.
जेव्हा १० वर्षांपूर्वी भारतामध्ये अॅमेझॉनची सुरुवात झाली, तेव्हा कदाचित कोणी विचारही केला नसेल की ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये इतकी प्रगती होईल आणि लोक त्यावर एवढे अवलंबून असतील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या साईटवर विविध गॅजेट्स, पुस्तकं, सीडी आणि इतर काही उत्पादनं होती. आज आम्ही तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहोत, ज्या अगदी सुरुवातीला अॅमेझॉनच्या माध्यमातून भारतामध्ये उपलब्ध होत्या.
पायल गिडवानी तिवारी यांचं पुस्तक - फ्रॉम XL टू XS: अ फिटनेस गुरुज गाईड टू चेंजिंग युअर बॉडी
सोनी वायर्ड हेडफोन - MDR-EX10LP-WHT4
सीडी - डीव्हीडी विभागामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, नौ दो ग्यारह, हाऊस नं. ४४ या सीडीजचा समावेश होता.
प्रीती सोनी यांचं पुस्तक - लाईफ इज व्हॉट यू मेक इट
ई-रीडर किंडल - हे ६ इंचाचं डिव्हाईस होतं. यामध्ये ई- इंक डिस्प्ले आणि वायफाय सुविधाही होती.
रश्मी बन्सल यांचं डिजिटल बुक - स्टे हंग्री स्टे फुलिश
काय पो चे या चित्रपटाची डिव्हीडी
ऑलिम्पस 8x40 DPS दुर्बिण
क्रिएटिव्ह झेन स्टाईल MP3 व्हिडीओ प्लेयर
JBL - जम्बो टू पीस एंटरटेनमेंट स्पीकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.