Video VIral
Video VIral

भारतीय नृत्य सादर करून अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं होणार स्वागत; तालमीचा Video Viral

त्यांच्या तालमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेतील ठिकठिकाणी त्यांचे जोराज स्वागत केले जाणार असून त्यांच्या आगमापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी भारतीय वंशाच्या महिला तयारी करत आहेत. रिचमंड येथे या महिला नृत्याची तयारी करताना दिसत आहेत. त्यांच्या नृत्याच्या तालमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video VIral
Post Viral : "बाप मिटमिट डोळ्यांनी पाहतोय फक्त"; अधिकारी होताच खून, काळीज पिळवटून टाकणारी दर्शनाची गोष्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर असतानाच 21 जून रोजी न्युयार्क येथील संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे नेतृत्व करणार आहेत. या समारंभात संयुक्त राष्ट्र महासभेच्या (UNGA) अध्यक्षा साबा कोरोसीही सहभागी होणार आहेत. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मी उत्साहित आहे." असं अध्यक्षा साबा कोरोसी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा न्यूयॉर्कमध्ये सुरू होईल, जिथे ते 21 जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करतील. त्यांच्या स्वागतासाठी भारतीय सांस्कृतीतील डान्स सादर केला जाणार असून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.