Anand Mahindra on BBC Anchor : कोहिनूर चोरला अन्.. चांद्रयानावरून भारतावर टीका करणाऱ्या BBC अँकरला महिंद्रांचे झणझणीत उत्तर

म्हणूनच टॉयलेट आणि स्पेस एक्सप्लोरेशन या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे हा विरोधाभास नाही.
Anand Mahindra
Anand MahindraSakal
Updated on

Chandrayaan - 3 : चांद्रयान मोहीम फत्ते करून भारताने जगात इतिहास घडवला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असून चंद्रावर पोहोचलेला चौथा देश आहे. पण २०१९ साली चांद्रयान - २ मिशन अपयशी ठरले होते त्यावेळी बीबीसी माध्यमाच्या एका अँकरने भारताची खिल्ली उडवली होती. तो व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी ब्रिटिशांना झणझणीत उत्तर दिलं आहे.

"पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या आणि कमालीची गरिबी असलेल्या भारताने अवकाश कार्यक्रमावर एवढा पैसा खर्च करावा का?" असं वक्तव्य ब्रिटिश अँकरने २०१९ च्या चांद्रयान मोहिमेवळी केलं होतं. त्यानंतर हा व्हिडिओ ट्वीट करत महिंद्रा यांनी चांगलंच सुनावलं आहे.

आपल्या ट्वीटमध्ये काय म्हणाले आनंद महिंद्रा?

"खरंच?? सत्य हे आहे की, आपली गरिबी ही अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीचा परिणाम आहे, ज्यांनी संपूर्ण उपखंडातील संपत्ती पद्धतशीरपणे लुटली तरीही आमच्याकडून लुटण्यात आलेली सर्वांत मौल्यवान संपत्ती कोहिनूर हिरा नसून आमचा अभिमान आणि आमच्या स्वतःच्या क्षमतेवर असलेला विश्वास होता. कारण वसाहतीकरणाचे उद्दिष्ट म्हणजे त्याचा सर्वात कपटी प्रभाव आणि त्यांच्या बळींना त्यांच्या कनिष्ठतेबद्दल पटवून देणे हा होता. म्हणूनच टॉयलेट आणि स्पेस एक्सप्लोरेशन या दोन्हीमध्ये गुंतवणूक करणे हा विरोधाभास नाही."

"सर, चंद्रावर जाण्यामुळे आपला अभिमान आणि आत्मविश्वास पुनर्संचयित करण्यात मदत होते. त्यातून विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीवर विश्वास निर्माण होतो. हे आपल्याला गरिबीतून बाहेर काढण्याची आकांक्षा देते. आकांक्षेचे दारिद्र्य ही सर्वांत मोठी गरिबी आहे" असं झणझणीत उत्तर आनंद महिंद्रा यांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.