Anant Ambani Barat: वऱ्हाड निघालं..! ढोल ताशाच्या गजरात अँटिलियामधून निघाले अनंत अंबानी, वरातीचा video viral

अनंत राधिकाच्या लग्नाला काही तासंच उरले आहेत.
 Anant Ambani Barat
Anant Ambani Baratesakal
Updated on

अनंत राधिकाच्या लग्नाला काही तासंच उरले आहेत. अशातच ढोल ताशाच्या गजरात अॅंटीलियामधून अनंत अंबानी यांची वरात निघाली आहे. या वरातीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. जगभरातील दिग्गज यांच्या लग्नाचे साक्षीदार ठरणार आहेत.

वरातीसाठी अनंत यांची करोडो रुपयांची रोल्स रॉयस कार लाल आणि पांढऱ्या फुलांच्या चादरीने सजवण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबाची वाहनेही फुलांनी सजवण्यात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच लाल रंगाच्या फुलांनी गाडीच्या बोनेटवर मोठं स्वस्तिक काढण्यात आलं आहे.

वधू राधिकाला घेण्यासाठी अँटिलियाहून लग्नाच्या ठिकाणी जिओ वर्ल्ड सेंटरकडे अनंत अंबानी रवाना झाले आहेत.

अनंतच्या लग्नासाठी पाहुण्यांची लगबग सुरु झाली आहे. WWE कुस्तीपटू जॉन सीना, जॅकी श्रॉफ व्यतिरिक्त विधू विनोद चोप्रा यांनी आपल्या कुटुंबासह लग्नसोहळ्याला हजेरी लावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.