Anant Radhika Wedding: लग्न अनंत अंबानीचे पण चांदी हॉटेल इंडस्ट्रीची; एका रात्रीच्या भाड्यासाठी मोजावे लागतायत तब्बल एवढे लाख

लग्न अंबानी कुटुंबाचं असलं तरी सर्वात मोठा फायदा मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीला होताना दिसत आहे.
Anant Radhika Wedding Bkc hotel housefull Rs 1 Lakh A Night
Anant Radhika Wedding Bkc hotel housefull Rs 1 Lakh A Night
Updated on

अनंत राधिका लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून दोघांच्या लग्नाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. दोघांच्या या ग्रँड सोहळ्याला जगभरातील पाहुण्यांची मंदियाळी पाहायला मिळत आहे. पण लग्न अंबानी कुटुंबाचं असलं तरी सर्वात मोठा फायदा मुंबईतील हॉटेल इंडस्ट्रीला होताना दिसत आहे. अनेक हॉटलेच्या एका रुमचे भाडे गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे.

अनंत राधिका 12 जुलैला सातफेरे घेणार आहेत. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटर येथे हा लग्न सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्नामुळं मुंबईतील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हॉटेल इंडस्ट्रीची चांदी झाली आहे. मुंबईतील मोठमोठ्या हॉटेल्स रूम्सच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे.

Anant Radhika Wedding Bkc hotel housefull Rs 1 Lakh A Night
Anant Radhika Wedding : लग्न अनंत राधिकाचे, पण इम्पॅक्ट मुंबईतील वाहतुकीवर; मार्गात अनेक बदल

मुंबईतील पंचतारांकित हॉटेल हाऊसफुल

बीकेसी परिसरात जिओ वर्ल्ड सेंटर येथेही बहुतांश लक्झरी हॉटेल्स हाऊसफुल्ल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अंबानींच्या लग्नासोहळ्यापूर्वी, ज्या हॉटेल्समध्ये एक रात्रीचे भाडे १३,००० रुपये होते तिथे आता लोकांना प्रत्येक दिवसासाठी ९१,३५० रुपये मोजावे लागत आहेत.

त्याचवेळी, ट्रॅव्हल बुकिंग वेबसाइट्सनुसार बीकेसी परिसरातील लक्झरी हॉटेल्सच्या बुकिंगवर ९ जुलैचे भाडे १० हजार ते १२ हजार रुपये आणि टॅक्स दाखवले, तर १५ जुलैचे भाडे १६ हजार रुपये अधिक कर दाखवत आहे. तसेच १० ते १४ जुलै दरम्यानचे सर्व बुकिंग फुल्ल झाले आहे.

Anant Radhika Wedding Bkc hotel housefull Rs 1 Lakh A Night
Anant Ambani - Radhika Merchant Wedding : "२९ रुपयांचा रिचार्ज जस्टिन बीबरच्या खिशात ?" मराठी अभिनेत्री अंबानी लग्नसोहळ्यावर थेट बोलली

हा ग्रँड लग्नसोहळा 14 जुलैपर्यंत सुरु राहणार

अनंत-राधिकाचे लग्न १२ जुलैला होणार आहे आणि लग्नानंतरचे कार्यक्रम १४ जुलैपर्यंत चालणार आहेत. 12 जुलै रोजी सात फेऱ्या आणि 13 जुलै रोजी शुभ आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये विशेष अतिथींचा समावेश असणार आहे.

14 जुलै रोजी भव्य स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी मुंबईत येणारे पाहुणे कुठे राहणार हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, भागाती हॉटेल्स बुक झाल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.