Special Child: कर्तुत्वाचं उत्तम उदाहरण! या भारतीय मुलीने अबू धाबीत जिंकलं Silver Medal

ती मानसिकरित्या कमकुवत असली तरी मात्र तिची इच्छाशक्ती तीव्र होती
Special Child Story
Special Child Storyesakal
Updated on

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !

ही म्हण जेवढी ऐकायला चांगली वाटते तेवढंच प्रत्यक्षात केल्यास त्याचं फळही तुम्हाला निश्चितच मिळतं. ही गोष्ट आहे एका २४ वर्षीय मुलीची. ती मानसिकरित्या कमकुवत असली तरी मात्र तिची इच्छाशक्ती तीव्र होती. नॅशनल ऑलिंपिकमध्ये वर्ल्ड समर गेम्स मध्ये दिल्ली टीममधून खेळज रौप्य पदक जिंकणारी आरुषी शर्मा आज मुलांना खेळायला शिकवते. मात्र एके काळी याच मुलीच्या कर्तुत्वावर लोकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जाणून घेऊया या शूर मुलीची कहाणी.

एके काळी दुसऱ्यांपुढे साधं बोलायला घाबरणारी मुलगी आज स्पोर्ट्स मिनिस्ट्रीसोबत काम करतेय. सोबतच तिच्या वक्तव्याने ती दुसऱ्या मुलांना मोटिवेटसुद्धा करते.

पाचव्या वर्गात पालकांना ती स्पेशल चाइल्ड असल्याचं कळलं

आरुषीचा जन्म फरीदाबादमध्ये झाला. काही काळानंतर ती आई-वडिलांसह नोएडामध्ये शिफ्ट झाली. पालकांनी नोएडाच्या एका प्रायव्हेट स्कूलमध्ये तिचं अॅडमिशन केलं. शाळेत मात्र या मुलीस अभ्यास काही कळेना.

अनेक प्रयत्नानंतरही आरुषीला अभ्यास उमगत नव्हता. तिला नोटिस करणारे लोकही म्हणायचे हिला 'तारे जमी पर' मूव्हीमध्ये दाखवलेला आजार तर नाही ना? खूप मेहनत घेतल्यानंतर या मुलीला पासिंग मार्क्स मिळायचे.

इयत्ता पाचवीत अखेर आरुषीच्या स्कूल टीचरनेही हाट टेकले. आरुषीचा आयक्यू लेव्हल फार कमी असून तिला स्पेशल स्कूलमध्ये टाका असं सांगण्यात आलं. तिला अखेर स्पेशल स्कूलमध्ये केल्या गेलं. तिचं अॅडमिशन माता भगवती चड्ढा स्कूलमध्ये करण्यात आलं. या शाळेत तिच्यावर अभ्यासाचा ताण नव्हता. तिला येथे खेळण्याची सूट दिली गेली. आठव्या वर्गापासून तिने प्रोफेशनली खेळायला सुरूवात केली.

Special Child Story
Sports News : ख्रिस गेलने निवडले 3 स्टार क्रिकेटपटू

बोर्डाच्या परीक्षेत रायटरची पडली गरज

१० वी आणि १२व्या वर्गात स्पेशल स्कूल मध्ये शिकल्या कारणाने आरुषीने रायटरची मदत घेतली होती. पुढचे शिक्षणही या मुलीने पूर्ण केले नाही. मात्र स्पोर्टबाबत तिची जवळीक होती.

Special Child Story
Sport : मयुरीची पदकांची हॅटट्रिक

२०१९ मध्ये अबू दाबीमध्ये जिंकलं मेडल

२०१९ मध्ये अबू दाबीमध्ये झालेल्या स्पेशल ऑलिंपिक वर्ल्ड समर गेम्समध्ये दिल्ली टीमकडून खेळत तिने सिल्वर मेडल जिंकलं. याआधीही आरुषीने अनेक नॅशनल अवॉर्ड जिंकले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()