Viral Video: चित्रपटात घडतं अगदी तसंच! पोलिसांनी कुख्यात गँगस्टरचा एन्काउंटर कसा केला? व्हिडिओ पाहाच

Assam Encounter Video: आसाममध्ये एका कुख्यात गँगस्टरचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 Assam Encounter
Assam Encounter
Updated on

नवी दिल्ली- आसाममध्ये एका कुख्यात गँगस्टरचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे थरारक दृश्य दिसत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी या एनकाऊंटरची माहिती सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरुन दिली आहे.

माहितीनुसार, मोस्ट वाँटेड गँगस्टर अफजल हुसैन लस्कर उर्फ लाल हा सिल्चर-हैलाकंडी सीमेलगत आला होता. याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून हा एन्काउंटर केला आहे. करच पोलिसांनी ही कारवाई केली आहे. एन्काउंटरवर वेळी लस्करने पोलिसांवर गोळीबार सुरु केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला.

 Assam Encounter
Viral video: बापाची BMW कार अन् बोनेटवर झोपून स्टंट; मुंबईतील गर्दीच्या भागात अल्पवयीन मुलाचा कार चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात म्हटलं आहे की, 'कुख्यात गँगस्टर अफझल हुसैन लस्कर ऊर्फ लाल याला कचर पोलिसांनी सिल्चर-हैलाकंडी येथे पकडलं होतं. आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल.'

सदर घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. एक पांढऱ्या कारच्या सभोवताली पाच ते सहा लोक गोळा झाल्याचं दिसत आहे. त्यातील एक व्यक्ती बंदुक कार चालवत असलेल्या व्यक्तीच्या दिशेने धरतो. त्यानंतर गोळीबार झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसतं. कार काही अंतर पुढे जाते आणि नंतर थांबते. 'सकाळ माध्यम समूह' या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

 Assam Encounter
Viral Video : 'लुट-पुट गया...' आंद्रे रसेलसोबत अनन्या पांडेचा जबरदस्त डान्स! सोशल मीडियावर 'त्या' पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

अफझल हुसैन हा खुंखार गुन्हेगार होता. तो अनेक दरोड्यांमध्ये गुंतलेला होता. कचर जिल्ह्यामध्ये त्याची दहशत होती. जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल होते. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. पण, पोलिसांच्या हाती तो लागत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.