Bengaluru PG Murder: मैत्री, प्रेम अन् ब्रेकअप! बंगळुरुरात होस्टेलमध्ये बिहारी तरुणीचा अमानुष खून

बंगळुरुमध्ये तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेश पोलिसांनी भोपाळमधून अटक केली आहे.
Benguluru Murder
Benguluru Murder
Updated on

बंगळुरु : अंगावर काटा आणणारा भीषण प्रकार बंगळुरुमधील एका होस्टेलमध्ये घडला आहे. वीस वेळा पोटात वार करुन नंतर गळा चिरुन एका तरुणीची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणात मैत्री, प्रेम आणि ब्रेकअप असा अँगल असून आरोपीला पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळ इथून अटक केली आहे. मृत्यू पावलेली तरुणी ही बिहारची रहिवासी आहे.

Benguluru Murder
तुमचा विकेंड मस्त जाईल! 'या' जुन्या कॉमेडी फिल्म्स पाहा

नेमकं काय प्रकरण?

अभिषेक आणि किर्ती हे सुरुवातीला चांगले मित्र होते. किर्तीची मैत्रिण राजपाली हिच्यासोबत अभिषेक रिलेशनशिपमध्ये होता. पण नंतर राजपाली हीनं अभिषेकपासून ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. यासाठी किर्तीनं तिची मदत केली. यामुळं अभिषेक किर्तीवर प्रंचड चिडला होता, या रागातूनच अभिषेकनं किर्तीवर धारदार शस्त्रानं २० भोसकून अन् शेवची गळा चिरुन खून केला. हा सगळा प्रकार बंगळुरुच्या कोरमंगला भागातील एका पीजी हॉस्टेलमध्ये घडला आहे. 23 जुलै रोजी घडलेल्या या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

२४ वर्षीय किर्ती कुमारी ही मूळची बिहारची रहिवासी होती. तिचं एमबीए झालं होतं, तसंच ती बंगळुरुतील एका आयटी कंपनीत काम करत होती. पोलिसांच्या चौकशीत अभिषेकनं सांगितलं की, बंगळुरुत काम करत असताना तो महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या किर्तीची मैत्रीण राजपाली हीच्या संपर्कात आला. यानंतर त्यांच्या मैत्री झाली आणि नंतर ते रिलेशनशिपमध्ये अडकले. काही दिवस त्यांचं रिलेशनशीप चालल्यानंतर दोघांमध्ये वाद झाले आणि राजपालीनं अभिषेकपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

Benguluru Murder
Sharad Pawar on Manoj Jarange: जरांगेंच्या आंदोलनामागे खरंच शरद पवारांचा हात आहे का? पवारांनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले...

पीजी हॉस्टोलला शिफ्ट झाल्यानं आरोपी होता नाराज

पोलिसांच्या माहितीनुसार, किर्तीची मैत्रीण राजपाली हिला अभिषेकच्या रिलेशनशीपपासून मुक्त व्हायचं होतं. यासाठी तिनं आपली मैत्रीण किर्तीची मदत मागितली. त्यासाठी किर्तीनं राजपाली हिला पीजी होस्टेलमध्ये शिफ्ट होण्यात मदत केली. यानंतर दोघींनी अभिषेकचा कॉल घेणं बंद केलं. राजपालीपासून दूर होणं आणि यासाठी किर्तीनं तिला मदत करणं अभिषेकला आवडलं नव्हतं. त्यामुळं तो किर्तीवर चिडलेला होता.

Benguluru Murder
Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा प्रश्नावर शरद पवारांनी सुचवला तोडगा! मुख्यमंत्र्यांनाही दिला 'हा' सल्ला

सीसीटीव्हीत काय कैद झालं?

आरोपी अभिषेक एक पिशवी घेऊन पीजी होस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावर जातो. तिथं राहणाऱ्या किर्तीच्या रुमवर जाऊन तो दरवाजा वाजवतो. त्यानंतर काही वेळातच किर्ती दरवाजा उघडते तेव्हा अभिषेक तिला बाहेर कॉरिडॉरमध्ये ओढतो. यानंतर दोघांमध्ये झटापट होते, किर्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तो आधी तिच्या गळ्यावर चाकूनं वार करतो. त्यानंतर तिच्या पोटात तो धारदार शस्त्रानं वार करतो.

किर्ती मदतीसाठी ओरडत राहते, पण हॉस्टेलमधील एकही मुलगी तिच्या मदतीसाठी बाहेर येत नाही. उलट आपल्या रुमच्या दरवाजावर उभं राहून हे कृत्य बघत राहतात. यामुळंच आरोपी अभिषेक तिथून फरार होतो. ही संपूर्ण घडामोड सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.