Bengaluru Viral Video : खरा हार्डवर्किंग कर्मचारी.. दुचाकीवर जाताना चक्क उघडला लॅपटॉप अन् मीटिंग केली जॉईन, व्हिडिओ व्हायरल

Peak Bengaluru Moment : या व्हिडिओला पाहून नेटिझन्स याला 'पीक बंगळुरू मूमेंट' म्हणत आहेत. तसंच, बंगळुरूमध्ये हे पाहणं सामान्य गोष्ट असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.
Bengaluru Viral Video
Bengaluru Viral VideoeSakal
Updated on

Bengaluru Techie Viral Video : जगभरातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे बॉसचा फोन! टेक्नॉलॉजीमुळे आपण सध्या कुठूनही ऑफिसचं काम करू शकतो. मात्र याचा टेक कर्मचाऱ्यांना फायदा होण्याऐवजी तोटाच जास्त होताना दिसत आहे. कारण तुमचा बॉस आता कधीही तुम्हाला फोन करून एखादं काम सांगू शकतो. मग अगदी तुम्ही घरी असो, ट्रॅफिकमध्ये असो, किंवा मग गाडीवर असो..

देशातील आयटी हब असलेल्या बंगळुरूमधील टेक कर्मचाऱ्यांचे असेच किस्से भरपूर प्रसिद्ध आहेत. कधी एखादा टेक कर्मचारी ट्रॅफिकमध्ये लॅपटॉपवर काम करताना दिसतो, तर कधी एखादी व्यक्ती फुटपाथवर लॅपटॉप उघडून बसलेली दिसते. अशाच एका 'हार्डवर्किंग' कर्मचाऱ्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे. यामध्ये हा कर्मचारी चक्क मोपेडवर लॅपटॉप उघडून बसला आहे. (Bengaluru man using laptop on scooter)

व्हिडिओमध्ये दिसतंय की ही व्यक्ती स्कूटर चालवत आहे. आपल्या मांडीवर त्या व्यक्तीने चक्क लॅपटॉप ठेवला आहे. या लॅपटॉपवर एक व्हिडिओ मीटिंग सुरू असल्याचं दिसतंय.. आणि या सगळ्यात ती व्यक्ती अगदी आरामात स्कूटर चालवत आहे. 'पीक बेंगळुरू' या एक्स हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Bengaluru Viral Video
Robot Dog Kanpur : 'रोबोट डॉग'ला पाहून खऱ्या कुत्र्यांची मजेशीर प्रतिक्रिया; कानपूरमधील व्हिडिओ होतोय व्हायरल

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. Peak Bengaluru या हँडलने आधीच हे स्पष्ट केलं आहे की आपण अशा प्रकारच्या कृत्याचं समर्थन करत नाही. "याच्या कामाचे 70 तास भरले नसावेत..", असं एका यूजरने म्हटलं. कित्येक यूजर्सनी अशा प्रकारे ड्रायव्हिंग करणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. तर कंपन्यांनी कामाचे तास फिक्स करावेत असंही अनेकांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.