एक बिहारी, सौ पे भारी! आवाज ऐकून नेटकऱ्यांना पडली भूरळ; Viral Video एकदा पाहाच

bihar boy Amarjeet Jaikar sings melodious voice video goes viral
bihar boy Amarjeet Jaikar sings melodious voice video goes viral
Updated on

सोशल मीडियावर दररोज काहीतरी व्हायरल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. कचा बादाम फेम भुबन, रानू मंडल अशी अनेक नावे अशाच व्हायरलं व्हिडीओमधून सर्वांच्या परिचयाची झाली आहेत.

सोशल मीडियाने अनेकांचं आयुष्य बदललं आहे. यामुळे कोणाल माहिती नसलेले चेहरे देखील प्रसिद्धीच्या झोतात येतात. असाच एक बिहारी पोरगा सध्या तुफान व्हायरल होतो आहे. याचं गाण्याची अनेकांना भुरळ पडली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर या तरुणांच्या व्हिडीओला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. या तरुणाचे नाव अमरजीत जयकर आहे. अमरजीतच्या त्याच्या आवाजातील गाणी त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करतो. त्याने पोस्ट केलेले हे व्हिडीओ चांगलेच प्रसिद्धी मिळवत आहेत. अमरजीतचे व्हिडीओ अनेक बड्या कलाकारांनी शेअर केले आहेत यामध्ये अनेक चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा देखील समावेश आहे.

bihar boy Amarjeet Jaikar sings melodious voice video goes viral
Sharad Pawar News : "८३ वर्षांचा योद्धा विद्यार्थ्यांसाठी मैदानात"; पवारांची कमिटमेंट पाहून नेटकरी भारावले

या गाण्यांना लोकांचं भरभरून प्रेम मिळतं. ट्विटर यूजर सोनू निगम यांनी जयकर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टला दिलेल्या कॅपशनमध्ये ते लिहीतात की, ऑटोट्यून लावून गाणी गाणारे हजारो जण सापडतील. पण आपल्या सरळ साध्या आवाजाने मन मोहून घेतो तोच अस्सल गायक असतो. भावाचे नाव अमरजीते जयकर आहे आणि तो मूळचा बिहारचा रहिवासी आहे. अशा टॅलेंटची कदर झाली पाहिजे.

अमरजीत जयकर हा या व्हायरल व्हिडीओत तो दिल दे दीया है, जान.. हे गाणं गातोय या व्हिडीओवरक देखील लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. हे गाणं ऐकणार प्रत्येक जण तरुणाच्या गोड गळ्याच्या प्रेमात पडल्याखेरीज राहाणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.