Stomach Surgery Viral News: धक्कादायक! २२ वर्षीय तरुणाच्या पोटात सापडलं नेल कटर, चाकू अन् चाव्या

Doctors performing surgery to remove metal objects from a 22-year-old man's stomach: तरुणाची मानसिक स्थिती अस्वस्थ असल्याने त्याच्यावर सध्या मानसोपचार चालू आहेत. डॉक्टरांनी त्याला विचारले असता, तो म्हणाला की, त्याने काही महिन्यांपूर्वी धातूचे वस्तू गिळण्यास सुरुवात केली होती. सध्या तरुणाची तब्येत स्थिर आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे.
Doctors performing surgery to remove metal objects from a 22-year-old man's stomach
Doctors performing surgery to remove metal objects from a 22-year-old man's stomachesakal
Updated on

बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील डॉक्टरांनी २२ वर्षीय तरुणाच्या पोटातून नेल कटर, चावीचा रिंग, छोटा चाकू आणि चाव्या काढल्या आहेत. ही घटना मोतिहारी शहरातील एका खासगी रुग्णालयात घडली. या तरुणाला काही दिवसांपूर्वी अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्या पोटात विविध धातूचे वस्तू असल्याचे लक्षात येताच, त्वरित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.