Biperjoy Alert in Gujarat : येत्या काळात गुजरातला अनेक वादळांचा सामना करावा लागू शकतो

15 जूनच्या संध्याकाळी ते सौराष्ट्र, गुजरातमधील कच्छ जाखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे.
Cyclone Alert in Gujarat
Cyclone Alert in Gujaratesakal
Updated on

Cyclone Alert in Gujarat : बिपरजॉय वादळाचा सर्वात मोठा धोका गुजरातला आहे. अरबी समुद्रातून निर्माण झालेल्या या वादळाने आता फारच भयंकर रूप धारण केले आहे. 15 जूनच्या संध्याकाळी ते सौराष्ट्र, गुजरातमधील कच्छ जाखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 125 ते 135 किमी असू शकतो. या दरम्यान हे वादळ मोठा विनाश घडवून आणू शकते.

विशेष म्हणजे मागच्या पाच वर्षात गुजरातच्या सागरी किनारपट्टीला प्रभावित करणारं हे चौथ मोठ वादळ आहे. आगामी काळात गुजरातला अनेक चक्रीवादळांचा सामना करावा लागू शकतो, असं हवामान तज्ज्ञांचं मत आहे. या वादळांमुळे राज्यात मोठा विध्वंस होऊ शकतो. तज्ज्ञ असं का म्हणत आहेत आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे ते बघुया?

गुजरातने 20 वर्षांत 4 मोठ्या वादळांचा सामना केला

गुजरातने 1998 पासून 20 वर्षांत 4 धोकादायक वादळांचा सामना केला आहे. 1998 मध्ये आलेल्या वादळाने गुजरातमध्ये भयंकर विध्वंस घडवून आणला होता. या चक्रीवादळात 1000 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हजारो जनावरं मरण पावली होती. या चक्रीवादळामुळे 10,000 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते. 2021 मध्ये गुजरातमध्ये तौक्ते वादळानेही मोठा हाहाकार माजवला होता. त्यावेळी 170 जणांना जीव गमवावा लागला. यासह मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली होती.

गुजरातला हवामान बदलाचा धोका

गुजरात हे चक्रीवादळाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील क्षेत्र बनल्याच तज्ज्ञांचं मत आहे. हवामानातील बदल हे त्याचं प्रमुख कारण आहे. गुजरातच्या भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रमुख मनोरमा मोहंती यांनी याबाबत आपलं मत मांडलंय. अरबी समुद्रातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांमध्ये वाढ होण्यामागे हवामान बदल हे प्रमुख कारण असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Cyclone Alert in Gujarat
Cyclone Biparjoy: वादळासोबत भूकंपही का येतो? जाणून घ्या कारण

याशिवाय लक्षद्वीप समूहाभोवती चक्रीवादळांच्या उत्पत्तीपासून गुजरातपर्यंतची फनेल-आकाराची किनारपट्टी हे देखील एक प्रमुख कारण आहे, ज्यामुळे सागरी चक्रीवादळे गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छच्या किनारपट्टीवर आदळतात.

समुद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात वाढ

येत्या काळात समुद्राच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान वाढणार असल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे गुजरातमध्ये आणखी चक्रीवादळ येऊ शकतात. नुकतेच IMD ने चक्रीवादळाच्या असुरक्षिततेवर एक संशोधन प्रकाशित केले. अलिकडच्या काळात गुजरातने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांमध्ये असुरक्षिततेत वाढ दर्शविली आहे.

Cyclone Alert in Gujarat
Biperjoy : बिपरजॉयच्या वार्‍यांमुळेच गणपतीपुळेत आली लाट, वेगासह करंट असलेला पहिलाच प्रकार

याशिवाय 2021 मध्ये भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या संशोधकांनी गुजरात किनारपट्टीवरील वाढत्या चक्रीवादळांबाबत मोठा दावा केला होता. (Gujrat) ते म्हणाले की 1982 आणि 2000 च्या तुलनेत 2001 ते 2019 दरम्यान अरबी समुद्रात चक्रीवादळांची वारंवारता आणि कालावधी वाढला आहे. ही वाढ 52 टक्क्यांपर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.