अमरोहा : लंचबॉक्स अर्थात डब्यात नॉनव्हेज बिर्याणी आणल्याबद्दल उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील एका खासगी शाळेनं बालवाडीतील मुलाला शाळेतून काढून टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची दखल घेत राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीनं अमरोहाच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना संबंधित प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अमरोहा जिल्हा बालहक्क संरक्षण आयोगाच्यावतीनं याप्रकरणी हिल्टन कॉन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापकांनी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बाजवली आहे.