Viral Photo : 'माझं अनुकरण करू नका'; भाजप मंत्र्याने सुचनांसहित पोस्ट केला फोटो

Temjen Imna Along
Temjen Imna Alongएोकोत
Updated on

माझं अनुकरण करू नका, हा स्टंट अनुकूल वातावरणात आणि प्रोफेशनल्सने केला आहे. अशा सूचना करत नागालँड येथील भाजपचे मंत्री तेमजेन इम्ना अलाँग यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये ते एका हातात प्लेट घेऊन दुसऱ्या हाताने काहीतरी खाताना दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

हेही वाचा - सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

व्हायरल होत असलेल्या फोटोच्या वर कॅप्शन देण्याचा काय अर्थ आहे हे अजून नेटकऱ्यांनाही कळालेले नाही. तर बरेचजण त्यांच्या या ट्वीटवरून संभ्रमात पडले आहेत. फोटोला असं कॅप्शन देऊन त्यांना नेमकं काय सांगायचं आहे हे अजून समोर आलं नसून या ट्वीटवर अनेक मजेशीर प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, अशा प्रकारे विनोदी पद्धतीने लोकांशी समाजमाध्यमाद्वारे पोहोचणारा राजकारणी आपल्याला क्वचितंच सापडेल. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.