Video Viral : भाजपच्या कार्यक्रमात राडा! गरिबांना वाटपासाठी आणलेल्या पेट्या लोकांनी पळवल्या

Viral Video
Viral VideoSakal
Updated on

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यक्रमातील पेट्या लोकांनी पळवल्याची घटना समोल आली असून याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या पेट्यांची पळवापळवी सुरू असताना बंब यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना लाठीमार केला तरीही दोन मिनीटात जवळपास १०० पेट्या लंपास करण्यात आल्या आहेत.

Viral Video
मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसले दरोडेखोर; बंदुकीचा धाक दाखवून बूट चोरले, CCTV Footage Viral

गंगापूरमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब यांच्या वतीन मोदी@9 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचं औचित्य साधून काही महिलांना आरोग्य कीटचे आणि कामगारांना पेट्यांचे वाटप करण्यात आले. पण ज्या ठिकाणी पेट्या ठेवल्या होत्या त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांनी गर्दी केली आणि पेट्या पळवून नेल्या.

बंब यांचा एक कार्यकर्ता पेट्यांच्या वर जाऊन बसला तरी त्याला काही लोकांनी खाली ढकलून दिलं. यावेळी लोकांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा राडा मंडपामध्ये पाहायला मिळाला. ज्यावेळी सगळ्या पेट्या पळवून नेल्या गेल्या त्यावेळीच मंडप शांत झाल्याचं पाहायला मिळालं.

"शेवटच्या काही मिनीटांमध्ये गडबड झाली आणि लोकांनी पेट्या पळवल्या कारण त्यांना गरज असेल. ज्यांच्याकडे कूपन नाहीत त्यांनीसुद्धा पेट्या नेल्या असतील त्याला आमची काही हरकत नाही पण ज्या लोकांना कूपन असूनसुद्धा पेट्या मिळाल्या नाहीत त्या लोकांचे कूपन आम्ही मागवून घेणार आहोत आणि त्यांना पेट्यांचे वाटप करणार आहोत." असं आमदार प्रशांत बंब म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.