Karnataka Election Meme : कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा निकाल आज, १३ मे रोजी जाहीर झाला. या राज्यात काँग्रेसला बहुमत मिळवत विजयी होणार हे निश्चित झालं आहे. राजकीय विश्लेषकांकडून भाजपच्या पराभवाची उकल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यादरम्यान भाजप खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये गंभीर तोंडावर बोट ठेवून गप्प बसण्याचा इशारा करताना दिसत आहे.
फोटो कुठला आहे?
आयपीएल २०२३ मध्ये झालेला १५वा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूर आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चिन्नास्वामी स्टेडीयमवर खेळण्यात आला होता. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स चे मेंटर गौतम गंभीर जे आक्रमक भूमिकेसाठी ओळखला जातो , त्याने सामन्यातील विजयाचा आनंद साजरा करताना आरसीबी फॅन्सना गप्प राहायला सांगितलं होतं. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
आता कर्नाटकात भाजपाच्या पराभवाचं कार गौतम गंभीरचे हे वागणं असल्याचं बोललं जात आहे. इथंच भाजप पक्ष कर्नाटक निवडणूक हरला असे म्हणत अनेक नेटकऱ्यांकडून हा फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
"इथंच भाजपने निवडणूक हारली होती, भाजप खासदार गंभीरने कर्नाटकचा अपमान केल्यामुळे काँग्रेसच्या बाजूने ७% मते पडली: प्रदीप गुप्ता" असं ट्वीट एका वापरकर्त्यांने केलं आहे.
एका युजरने राहुल गांधी भाजप खासदार गौतम गंभीरला ट्रोल करताना असं म्हणत दोघांचा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो वापरून आता भाजपला ट्रोल केलं जात आहे.
भाजपने कर्नाटक गमावण्याचे कारण म्हणजे गौतम गंभीर आणि त्याची वृत्ती असं एका वापरकर्त्यांने फोटो शेअर करत म्हटलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.