ब्रेकअप झालेल्या एका मुलीची ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग इंस्टाग्रामवर व्हायरल झाली होती. ती आपल्या मैत्रिणीला आपली व्यथा सांगत होती. पण तिच्या मैत्रिणीने ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली असून त्यानंतर ट्वीटरवर मीम्स व्हायरल झाले आहेत. वंशिका असं ब्रेकअप झालेल्या मुलीचे नाव असून सध्या तिला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं जात आहे.
(Vanshika Call Recording Viral)
दरम्यान, वंशिका या मुलीचे ब्रेकअप झाल्यानंतर तिने आपल्या मैत्रिणीला फोन करून आपलं गऱ्हाणं मांडलं होतं. पण तिने वंशिकाचा फोन कॉल रेकॉर्ड करून व्हायरल केला. तर तिला खोटी सहानुभूती देण्याचं दाखवून दिलं. वंशिकाला बोलताना ही मैत्रीण मध्येमध्ये हसताना या व्हिडिओत दिसत आहे.
वंशिका फोनवर बोलताना आपल्या मैत्रिणीला बॉयफ्रेंडबद्दल सांगत आहे. "मी त्याच्यासाठी खूप काही केलं, अनेक मुलांना त्याच्यासाटी नाकारलं पण त्याने माझ्यासाठी काहीच केलं नाही" असं ती म्हणते. तर समोरची मुलगी दुसऱ्या मुलाचा नंबर देते म्हणून तिला सहानुभूती देते. ट्वीटरवर अनेक मीम्स या व्हिडिओवरून व्हायरल झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.