रस्त्यावर धावू लागली पेटलेली कार, लोकांची वाहने वाचवण्यासाठी एकच पळापळ; 'बर्निंग कार'चा थरारक Video Viral

Burning Car Moves On Jaipur Road : राजस्थानच्या जयपूरमधील सोडाला एलिव्हेटेड रोडवर शनिवारी दुपारी एक भीषण घटना घडली.
Burning Car Moves On Jaipur Road
Burning Car Moves On Jaipur Road
Updated on

राजस्थानच्या जयपूरमधील सोडाला एलिव्हेटेड रोडवर शनिवारी दुपारी एक भीषण घटना घडली. या रस्त्यावर एका चालत्या कारला आग लागली, इतकेच नाही तर हे पेटलेली कार रस्त्यावर धावताना दिसून आली. हा भीषण फ्रकार पाहून रस्त्यावरील लौक देखील सैरैवैदा धावताना दिसले. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जयपूरमध्ये हा बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. या कारमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार कारने पेट घेतल्यानंतर ड्रायव्हरने गाडीबाहेर उडी मारली ज्यामुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. दरम्यान आता या बर्निंग कारचा व्हिडीओ शोशल मीडियावर व्हायरल होत आहे,.

या एसयूव्ही कारला अचानक आग लागली. कार चालकाला काही समजण्यापूर्वीच आग संपूर्ण कारमध्ये पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, गाडीच्या मालकाचे नाव मुकेश गोस्वामी असून तो अलवरचा राहाणारा आहे. अपघात झाला त्यावेळी मुकेश गोस्वामी यांचा मित्र जितेंद्र जांगीड कार चालवत होता. जितेंद्र जांगीड यांना कारमध्ये लावलेल्या ब्लोअरमधून धूर येत असल्याचे जाणवताच त्यांनी कार थांबवून तपासणी केली. मात्र अचानक कारने पेट घेतला.

Burning Car Moves On Jaipur Road
Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

आगीमुळे हँडब्रेक खेचूनही कार स्वतःहून रस्त्यावर धावू लागली. त्यामुळे रस्त्यावर उपस्थित नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. अखेरीस एलिव्हेटेड रोडवर एका उतारावर गाडी थांबली. तेथे उपस्थित लोकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Burning Car Moves On Jaipur Road
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, "मला तर वाटतेय..."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.