Drunk And Drive: मद्यधुंद कारचालकानं महिलेला चिरडलं अन् स्कुटर 1 किमीपर्यंत नेली फरफटत! व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओमध्ये कारनं स्कुटरला फरफटत नेताना ठिणग्या उडत असल्याचं दिसत आहे.
Drunk And Drive
Drunk And Drive
Updated on

Drunk And Drive Odisha: कार चालकानं महिलेला धडक देत स्कुटरला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची भीषण घटना समोर आली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथं बुधवारी रात्री ही घटना घडली असून कार चालक नशेत असल्याचं सांगितलं जात आहे.

स्थानिक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं वेगानं कार पुढे नेली. याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. (car was seen dragging bike for atleast kilometre on in bhubaneswar odisha)

पीटीआयच्या माहितीनुसार, भुवनेश्वरच्या स्मार्ट सीटीतील पाटिया-नंदनकनन रोडवर ही घटना घडली असून कारनं पहिल्यांदा दुसऱ्या एका कारला धडक दिली त्यानंतर एका महिलेच्या अंगावर कार घातली आणि बाजुला उभ्या असलेल्या एका स्कुटरला त्यानं फरफटत नेलं. त्यानंतर जेव्हा स्थानिक नागरिकांनी कारचालकाना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं कारचा वेग आणखीन वाढवला आणि ही स्कुटर सुमारे १ किमी पर्यंत फरफटत नेली. (Marathi Tajya Batmya)

Drunk And Drive
Mumbai Blast Threat Message: मुंबईतील सहा ठिकाणं बॉम्बनं उडवण्याची धमकी! पोलिसांना आलेल्या मेसेजमुळं खळबळ

ज्यावेळी कारनं स्कुटरला फरफटत नेलं जात होतं, त्यावेळी रस्त्यावर मोठ्या ठिणग्या उडत होत्या. हे भयानक दृश्य या कारमागून जाणाऱ्या दुसऱ्या एका वाहनचालकानं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Latest Marathi News)

Drunk And Drive
USA Indian Student Death: अमेरिकेच्या ओहायोत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; आठवड्याभरातील तिसरी घटना

या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. या घटनेनंतर तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारचालक पाटिया भागातच राहत असून तो कार चालवताना दारुच्या नशेत होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून आरोपी कार चालकाला अटकही केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.