VIDEO : फुकटात कार्यकर्त्यांना चहा पाजणं भाजप आमदाराच्या अंगलट; भररस्त्यात अडवला चहावाल्यानं ताफा!

निवडणुकीत चहा विक्रेत्यानं आमदाराच्या सांगण्यावरून सर्व कार्यकर्त्यांना चहा दिला होता. पण, पैसे मिळाले नाहीत.
Karan Singh Verma
Karan Singh Vermaesakal
Updated on
Summary

निवडणुकीत चहा विक्रेत्यानं आमदाराच्या सांगण्यावरून सर्व कार्यकर्त्यांना चहा दिला होता. पण, पैसे मिळाले नाहीत.

मध्य प्रदेशाच्या सिहोर जिल्ह्यातील (Madhya Pradesh Sehore) इछावर विधानसभा मतदारसंघातील (Ichhawar Assembly Constituency) आमदार करण सिंह वर्मा यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. वास्तविक, आमदारांच्या ताफ्याला एका चहा विक्रेत्यानं भररस्त्यात अडवल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय.

भाजपचे आमदार करण सिंह वर्मा (Karan Singh Verma) एका कार्यक्रमाला जात होते. यावेळी अनेकांनी आमदारांच्या गाडीला घेराव घातला. याच गर्दीतील एका चहा विक्रेत्यानं आमदारांना 30 हजार रुपये थकबाकी भरण्यास सांगण्यास सुरुवात केली. व्हिडिओ समोर आल्यानंतर आमदारानंही चहा विक्रेता आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचं सांगत आपला बचाव केला.

Karan Singh Verma
आजारी बापाला तूप आणण्यासाठी गेलेल्या मुलीवर 5 जणांचा सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये 3 BSF जवानांचाही सहभाग

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, आमदारांची गाडी थांबताच एक व्यक्ती त्यांना पैसे देण्यास सांगत आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत या चहा विक्रेत्यानं आमदाराच्या सांगण्यावरून आपल्या सर्व कार्यकर्त्यांना चहा दिला होता, असं चहावाला सांगत आहे. त्यासाठीचे उर्वरित 30 हजार रुपये आमदारांनी अद्याप दिलेले नाहीत. व्हिडिओमध्ये चहावाला सांगत आहे, 'या आमदारांनी मला पैसे दिले नाहीत. 4 वर्षे होऊन गेली, पण अद्याप मला पैसे मिळाले नाहीत.' यावर आमदार करणसिंह वर्मा सांगताहेत, 'मी याला पैसे दिले आहेत.' सोशल मीडिया रिपोर्ट्सनुसार हा चहा विक्रेता ब्लॅकमेल करत असल्याचं आमदारांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, "पैसे कधीचे आहेत हे मलाच माहीत नाही? माझ्या कार्यकर्त्यांनी दोनदा पैसे दिले आहेत." सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.