Chin Tapak Dum-Dum : सापडला ओरिजिनल 'चिन टपाक डम डम', इंटरनेटचा जन्म होण्याआधी किशोर कुमारांनी केलं होतं व्हायरल पहा Video

Insta Viral Dialouge : ‘चिन टपाक डम-डम’ हा एक डायलॉग आहे. आणि ते छोटा भीम या कार्टुनमधील आहे अशी चर्चा आहे.पण, यातही आहे एक ट्विस्ट.
chin tapak tapak dam dam kishore kumar
chin tapak tapak dam dam kishore kumaresakal
Updated on

Chin Tapak Dum-Dum :

गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर एक ट्रेंड व्हायरल होत आहे. ‘Chin Tapak Dum Dum’ हा तो ट्रेंड असून लोकांनी सध्या यावर रिल्सचा पाऊस पाडला आहे. कॉमन मॅनपासून सेलिब्रिटींनीही यावर रिल्स बनवले आहेत. अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही लाल साडीत यावर रिल केले आहे.

सेलिब्रिटींचीही फेव्हरेट बनलेला हा डायलॉग नक्की काय आहे, त्याचा शोध कोणी लावला याबद्दल जाणून घेऊयात. ‘चिन टपाक डम-डम’ हा एक डायलॉग आहे. आणि तो छोटा भीम या कार्टुनमधील आहे अशी चर्चा आहे. सर्वच लोकांना तसे वाटत आहे. पण असं नाही. यातही आहे एक ट्विस्ट. (Chin Tapak Dum-Dum)

chin tapak tapak dam dam kishore kumar
Viral Video: दिलदार मालक! कारचे गुपचूप फोटो काढणाऱ्या दिव्यांगाला पोर्शेतून फिरवले; व्हिडिओ पाहून फुलेल तुमचाही चेहरा

सोशल मिडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. १०-१५ वर्षांआधी असलेल्या गोष्टीही व्हायरल होतात. पण, आता जी ‘चिन टपाक डम-डम’ ची धून ट्रेंडमध्ये आहे ती ५८ वर्ष जूनी आहे. होय, आणि ही धुन अभिनयाचे बादशहा किशोर कुमार यांनी वापरली आहे.

५८ वर्षांआधी किशोर कुमार यांचा १९६६ मध्ये ‘लडका लडकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील एका सीनमध्ये किशोर कुमार यांनी हे वाक्य वापरले आहे. याचाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. (Social Media Reel)

chin tapak tapak dam dam kishore kumar
Viral Story: हर कुत्ता अपने गली मे शेर होता है! खरं ठरलं ना भाऊ...थेट सिहांशी भिडले, VIDEO पाहा....

आत्तापर्यंत लोकांना वाटत होतं की छोटा भीमच्या कार्टूनमधून या ‘चिन टपाक डम-डम’चा उदय झाला आहे. त्यातील एक नकारात्मक पात्र आहे त्याच नाव आहे टाकीया. त्याने जादुई शक्तीचा वापर करताना हा डायलॉग म्हटला आहे. आणि तो व्हायरल झाला आहे. पण, सोशल मिडियावर कोणतीही गोष्ट लपू शकत नाही. तसेच ही गोष्टही आता उघडकीस आली आहे.

ही क्लीप किशोर कुमार यांची आहे हे समजल्यानंतर लोकांनी आता त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. प्रत्येक मास्टरपीसची एक स्वस्त कॉपी असते, असे एका युजरने लिहीले आहे. तर, एका नेटकऱ्याने ‘किशोर कुमार आजच्या मॉडर्न सोसायटीत फिट बसतात’ असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.