Crime News : WHOच्या महिला ऑफिसरचा राहत्या घरी गूढ मृत्यू; पोस्टमार्टम मध्येही खुलासा नाही
लखनऊ : उत्तर प्रदेश येथील आजमगढ येथील जिल्हा महिला हॉस्पिटलमध्ये असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यालयात प्रशासकीय सहाय्यक/लेखा अधिकारी म्हणून काम करणाऱ्या एका २६ वर्षीय महिलेचा राहत्या घरी गूढ पद्धतीने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्येसुद्धा या प्रकरणाचा खुलासा झाला नसल्यामुळे चर्चेंना उधाण आलं आहे.
अधिक माहितीनुसार, पल्लवी सिंह असं या महिला अकाऊंट अधिकाऱ्याचं नाव असून त्या शहरातील एका कॉलनीत भाड्याच्या घरात राहत होत्या. जौनपूर येथून आलेल्या पल्लवी हिला तिच्या ओळखीच्या एका मित्राने विष देऊन हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्येसुद्धा काहीच खुलासा न झाल्यामुळे पल्लवीचे मामा विनोद सिंह म्हणाले की, आरोपी युवकाने तिच्या भाड्याच्या घराचा शोध घेतला होता. आम्ही या तरूणाला पल्लवीसोबत लग्नासाठी विरोध करत होतो म्हणून त्याने हे कृत्य केलं आहे. घटनेनंतर तो आणि त्याची गाडीही तिथेच सापडली असा आरोप त्यांनी केला.
पुढच्या वर्षी होणार होते लग्न
मृत पल्लवीच्या वडिलांनी सांगितले की, पल्लवी एका आठवड्यापासून भाड्याच्या घरात एकटी राहत होती. तिचे लग्न २० फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार होते. ५ मे रोजी तिचा साखरपुडा झाला होता. तिच्या मृत्यूनंतर आम्ही ज्यावेळी तिच्या रूमवर पोहोचलो त्यावेळी समजलं की, गौरव नावाचा मुलगा एका आठवड्यापासून तिच्या रूमवर येऊन राहत होता.
तो तिच्या मृत्यूच्या वेळीसुद्धा तिथेच होता. तिच्या शरिरावर जखमा दिसत होत्या. गौरव कुमार सिंह आणि त्याची आई रंभा सिंह यांनी मिळून माझ्या मुलीची हत्या केली आहे. पोलिसांत तक्रार दाखल केली तर जीवे मारून टाकण्याची धमकीसुद्धा त्यांनी दिली असल्याचा आरोप पल्लवीच्या वडिलांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.