जीवनात खूप वेळा असे प्रसंग येतात की त्यावेळी आपल्याकडे खूप कमी वेळ असतो आणि तेवढ्यात आपल्याला योग्य निर्णय घ्यावा लागतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक मगर पाणी पित असलेल्या हरणावर हल्ला करते पण त्याची समयसूचकता पाहून आपल्यालाही धक्का बसेल.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ जंगलातील एका पाणवठ्यावरील आहे. हरीण पाणी पित असताना क्षणात मगर वेगाने हरणावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते पण हरणाने मायक्रोसेकंदामध्ये दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. हरणाने जागेवरून उडी मारल्याममुळे ते मगरीच्या हल्ल्यापासून वाचले आहे.
दरम्यान, आयुष्यात अशी तत्परता असणे आवश्यक आहे. माणसाने एवढं शार्प असावं कारण मायक्रोसेकंदाचा हिशोब चुकला की थेट स्वर्गाचे दार गाठाल अशा कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत. तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.