Crocodile Viral News : ऐय्यो... या देशाने पाळल्यात चक्क १२ लाख मगरी, कायद्याने करतात मगरींची शेती

जगातल्या या देशात मगरींची शेती केली जाते आणि मोठे झाल्यावर त्यांना मारून टाकतात, जाणून घ्या कारण.
Crocodile Farming
Crocodile Farmingesakal
Updated on

Crocodile Farming Viral News : आजवर तुम्ही भाज्या, फळे, फुलांची शेती ऐकली असेल, पण जगातल्या या देशात चक्क मगरींची शेती केली जाते. इथे मोठ्या प्रमाणात मगरींची शेतं आहेत. जिथे मगरीना पाळलं जातं. पण हा एवढा भयानक जीव कोणी का पाळवा? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. जाणून घेऊया सविस्तर

का केली जाते मगरींची शेती?

  • थायलंडमध्ये मोठ्याप्रमाणात मगरींची शेती केली जाते. पण यात आश्चर्याची गोष्ट ही आहे की, जेवढ्या मोठ्याप्रमाणात त्यांना पाळलं जातं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्यांची कत्तलही केली जाते.

  • इथे मोठ्याप्रमाणात मगरींचे स्लॉटर हाऊस आहे. जिथे मगरींना त्यांच्या चामड्यासाठी, मांसासाठी आणि रक्तासाठी कापले जाते.

  • थायलंडमध्ये असे मगरीचे मोठमोठे फार्म्स आहेत.

  • मगरीसारख्या भयानक प्राण्याला बघण्यासाठी या शेतांमध्ये अनेक प्रवासीपण येतात.

Crocodile Farming
Viral News : ही नारी एकदम भारी! 9 महिन्याची गरोदर असताना मैदानात लावली दौड अन् बनली चॅम्पियन

३५ पेक्षा जास्त वर्षांपासून आहे शेती

थाय फिशरी डिपार्टमेंटनुसार १००० पेक्षा जास्त फार्म मध्ये साधारण १२ लाख मगरी आहेत. यात श्री आयुथ्या क्रोकोडाइल फार्म थायलंडमधला सर्वात मोठा फार्म आहे. जो मागील ३५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून चालू आहे.

कायदेशीररित्या केली जाते मगरींची कत्तल

भास्करच्या एका वृत्तानुसार फार्मची ओनर विचियान रियुआंगनेट यांनी सांगितलं की, त्यांचं फार्म कंव्हेक्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडँगर्ड स्पीशीज ऑफ वाइल्ड फॉना अँड फ्लोरा मध्ये कायदेशीररित्या नोंदणीकृत आहे. ते कायदेशीररित्या या मगरींची कत्तल करतात. त्यांना मगरींपासून प्रॉडक्ट बनवणे आणि ते एक्स्पोर्ट करण्याची परवानगी मिळाली आहे.

Crocodile Farming
Viral News : बायकोशी भांडणं आणि हाती लागलं घबाड, जगातल्या सगळ्यात नशीबवान नवऱ्याची गोष्ट

मगरीच्या पार्ट्सना अशी मिळते किंमत

  • मगरीच्या शरीरातील काही भागांतून औषधे बनवली जातात.

  • मगरीच्या पित्ताचा आणि रक्ताचा औषधांसाठी उपयोग होतो.

  • मगरीचं रक्त १००० रुपये प्रति किलो आहे.

  • पित्त ७६ हजार रुपये प्रति किलो विकलं जातं.

  • तर मगरीचं मांस ५७० रुपये प्रति किलो विकलं जातं.

मगरीच्या चामड्याच्या बनतात महागड्या बॅग्ज

  • मगरीच्या चामड्यापासून हँडबॅग, लेदर सूट्स, व्हॉलेट्स अशा वस्तू बनतात.

  • मगरीच्या चामड्यापासून बनवलेल्या बॅग्जची किंमत दीड लाखापर्यंत (२३५६ डॉलर्स) असते.

  • लेदर सूट्सची किंमत साधारण ४ लाख रुपये (५८८५ डॉलर्स) असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.