VIDEO : टॉयलेट सीट चोरीच्या संशयावरून भाजप नेत्यानं दलित तरुणाच्या तोंडाला फासलं काळं अन्..

दलित तरुणाचं मुंडन करून त्याची गावातून धिंड काढली.
Uttar Pradesh Viral Video
Uttar Pradesh Viral Videoesakal
Updated on
Summary

दलित तरुणाचं मुंडन करून त्याची गावातून धिंड काढली.

राजस्थानमधील जालोर जिल्ह्यात एका दलित विद्यार्थ्याला शाळेतील शिक्षकानं पाण्याच्या भांड्याला हात लावल्यामुळं बेदम मारहाण केली. ही घटना ताजी असतानाच आता उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बहराइचमध्ये टॉयलेट सीट चोरल्याच्या संशयावरून एका दलित तरुणाला भाजप नेत्यानं मारहाण करत त्याच्या तोंडाला काळं फासलंय.

भाजप नेता (BJP Leader) एवढ्यावरच न थांबता त्या तरुणाचं मुंडन देखील केलं. राजेश कुमार असं त्या दलित तरुणाचं (Dalit Youth) नाव आहे. भाजपचे नेते राधेश्याम मिश्रा (Radheshyam Mishra) व त्याच्या दोन साथीदारांनी राजेशवर टॉयलेटची सीट चोरल्याचा आरोप केला आहे.

Uttar Pradesh Viral Video
BJP : समस्या सांगायला गेलेल्या महिलेला भाजप नेत्यानं भरकार्यक्रमात थोबाडलं; संतापजनक Video Viral

त्यानंतर त्यांनी राजेशला एका खांबाला बांधून ठेवलं आणि त्याच्या तोंडाला काळं फासलं. त्यानंतर त्याचं मुंडन करून त्याची गावातून धिंड काढली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात मिश्रा राजेशला मारहाण करताना दिसत आहे. या प्रकरणी मिश्रा व त्यांच्या दोन साथीदारांविरोधात अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यात आलीय. मिश्रा हा सध्या फरार असून त्यांच्या दोन साथीदारांना अटक केलीय.

Uttar Pradesh Viral Video
Kolhapur : एकनाथ शिंदे राष्ट्रवादीला धक्का देण्याच्या तयारीत; 'हा' नेता शिंदेंची ढाल-तलवार हाती घेणार?

बहराइचचे एएसपी (ग्रामीण) अशोक कुमार म्हणाले, “दोन जणांना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित तरुणानं त्यांच्या घरातून काही वस्तू चोरल्याचा संशय त्यांना आला आणि त्यांनी त्याला मारहाण केली. चोरीचा संशय असल्यास त्यांनी पोलिसांत तक्रार करायला हवी होती.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.