राजस्थानमधील झुनझुनू जिल्ह्यात एक अजब घटना समोर आली आहे. डॉक्टरांनी मृत घोषित केलेला २५ वर्षांचा तरुण अंत्यसंस्काराच्या काही क्षण तो चितेवर शुद्धीत आला.
यामुळे स्मशानभूमीत एकच गोंधळ झाला. या घटनेनंतर तीन डॉक्टरांना निलंबित केले आहे.
रोहिताशकुमार नावाचा मूक-बधीर तरुण एका अनाथाश्रम राहत होता. तेथे गुरुवारी (ता.२१) रोहिताशची तब्येत खालावल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला झुनझुनूच्या बीडीकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.