विवाह हा दोन कुटुंब आणि मनांना एकत्रित आणणारा सोहळा आहे. विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी वर-वधु पक्षातील लोक झटत असतात. कारण, विवाहप्रसंगी एखादा गैरसमज झाला तर लग्न मोडू शकतं. त्यामुळे विवाहप्रसंगी योग्य ती काळजी घ्यावी लागते. पण तरीही काही प्रसंग असे घडतात ज्याचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतात.
सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्या व्हिडिओत लग्नाच्या वेषात बसलेल्या नवरीने नवऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. नक्की तिने असं का केलं पाहुयात. (Viral Video)
व्हिडिओमध्ये नवरा-नवरी स्टेजवर बसले होते. नवऱ्यामुलासोबत सेल्फी घेण्यासाठी एक तरूणी आली. या तरूणीने दोघांऐवजी फक्त नवऱ्यासोबत सेल्फी घेतला. तो सेल्फी घेताना नवरी मुलगी त्या कॅमेऱ्याकडे पाहतही नाही.
त्या मुलीसोबत आपला नुकताच झालेला नवरा सेल्फी घेतोय. याचा राग अनावर झाला अन् नवरीमुलीने चक्क नवऱ्याला फटकारले. अचानक झालेल्या या गोष्टीने नवरा मुलगाही हादरला.
जे घडले ते पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. अनेक लोक म्हणत आहेत की, हा व्हायरल व्हिडिओ फेक असू शकतो. किंवा तो तसा बनवला गेलेला असू शकतो.
आजकाल अनेक कंटेंट क्रिएटर्स सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवतात. जेणेकरून त्यांना अधिक व्ह्यूज मिळू शकतील. (Trending News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.