Banke Bihari Temple Viral Video: मथुरा-वृंदावन येथील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात लोकं अंधश्रद्धेच्या आहारी जाताना पाहायला मिळाले. ज्यामध्ये लोकं एसी (AC)चे पाणी चरणामृत समजून पित होते. लोकांच्या या अंधश्रध्देला नेटकऱ्यांद्वारे ट्रोल केले जात आहे. मंदिरातील या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडीओनंतर लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला. पण, त्यानंतरही लोकांनी पाणी पिण्यासाठी गर्दी केली.
बांके बिहारी मंदिरात, हत्तीच्या आकाराच्या शिल्पातून टपकणारे पाणी पिण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्या होत्या. ते चरण अमृत किंवा भगवान कृष्णाच्या चरणांचे पवित्र पाणी आहे असे मानून त्यांनी ते कपात गोळा केले देवाचे चरण अमृत समजून अनेकांनी पाणि प्यायले. व्हिडीओ करणारा भाविकांना सत्य परिस्थिती सांगताना व्हिडीमध्ये पाहायला मिळत आहे.
वृत्तानुसार, भक्तांना जे पवित्र पाणी वाटले होते ते प्रत्यक्षात एसीमधून सोडण्यात आले होते. हे पाणी मंदिराच्या स्थापत्य कलेचा भाग असलेल्या हत्तीच्या आकाराच्या तोंडामधून जात होते. त्यानंतर कोणीतरी चित्रीकरण करत आहे आणि भक्तांना पाण्याच्या खऱ्या स्रोताविषयी सावध करताना व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. परंतु अनेकांनी पाणी पिणे सुरूच ठेवले आणि स्वतःवरही शिंपडले.
ट्वीटरवर २.८ दशलक्ष दृश्यांसह व्हिडिओ पटकन व्हायरल झाला. ही घटना अनेकांनी मनोरंजन म्हणून पाहिली. तर अनेकांनी चिंता व्यक्त केली. काही दर्शकांनी पाणी पिणाऱ्यांवर टीका केली, तर काहींनी व्हिडीओ करणाऱ्यावर टीका केली.