Diamond Fraud: 32 लाखांच्या हिऱ्यांच्या जागी दिलं गुटख्याचं पाकीट! गुजराती व्यापाऱ्याला अटक

गुजरातच्या सूरत शहरात हा प्रकार घडला आहे.
diamond
diamond
Updated on

सूरत : एका व्यापाऱ्यासोबत झालेल्या व्यवहारात एका ठगानं व्यापाऱ्याला ३२ लाख रुपयांच्या हिऱ्याऐवजी गुटख्याचं पाकीट दिल्याचा प्रकार घडला आहे. गुजरातच्या सूरतमध्ये हा प्रकार घडला असून पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे. (Diamond Fraud Gujarati businessman arrested for giving Gutka packets instead of rupees 32 lakh diamonds)

diamond
Ajit Pawar: मंत्रालयात 3 हजार फाईल्स पडून अन् मुख्यंमत्र्यांनी साताऱ्यात तीन दिवसांत...; अजितदादांचा टोमणा

एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, व्यापाऱ्याच्या पार्सलमध्ये ठेवलेल्या ३२ लाख रुपये किंमतीच्या हिऱ्याऐवजी गुटख्याच्या पाकिटात बदललं. व्यापारी ऋषभ व्होरा यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं की, "आरोपी राहिल मंजानी हा हिऱ्यांच्या ब्रोकर म्हणून काम करतो. त्यानं मला विश्वासात घेत दुसऱ्या व्यापाऱ्याला हिरे विकण्याच्या बहाण्यानं ३२,०४,४४२ रुपयांचा नैसर्गिक गुणवत्ता असलेले हिरे पॉलिश करण्याच्या बहाण्यानं घेतले. त्यानंतर त्यानं १३ फेब्रुवारीपासून २१ फेब्रुवारी दरम्यान तीन सीलबंद पार्सलमध्ये हिरे घेतले आणि टोकनच्या स्वरुपात मला २ लाख रुपये दिले"

diamond
Ajit Pawar: "प्रकल्प आणण्याची धमक सरकारमध्ये नाही"; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

व्यापारी व्होरा यांनी सांगितलं की, "आरोपीनं पुन्हा मला सांगितलं की पुढील तीन चार दिवसांत त्याचं पेमेंट करेल. पण जेव्हा पेमेंट झालं नाही तेव्हा आपण त्याच्याकडं आपलं पार्सल मागितलं यानंतर हे तिन्ही सीलबंद पार्सल ब्रोकरच्या समोरचं खोलण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे पार्सल खोललं गेलं तेव्हा त्यामध्ये हिऱ्याच्याऐवजी गुटख्याची पाकिटं पाहून मला धक्काच बसला" व्यापाऱ्यानं आरोप केला की ब्रोकरनं त्याला विश्वासात घेऊन दुसऱ्या हिरे व्यापाऱ्याशी मिळून गुटखा देऊन फसवणुकीचा कट रचला.

diamond
Narhari Zirwal: "आमदार अपात्रतेचं प्रकरण माझ्याकडं येऊ द्या, मग..."; झिरवळांनी थेटच सांगितलं

दरम्यान, आरोपीविरोधात कलम ४२० आणि कलम ४०९ अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणाची चौकशी केली जात असून यामध्ये दुसऱ्या व्यापाऱ्याचा हात आहे की नाही, याची चौकशी केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.