Diwali Travel : ऐकावं ते नवलंच! दिवाळीत 'या' ठिकाणी साजरा होतो 'भूतांचा उत्सव'; पहा कुठे पहायला मिळेल भूत?

देशातील काही राज्यात भूतांसाठीचा उत्सव साजरा केला जातो.
Ghost Festival
Ghost Festivalesakal
Updated on
Summary

देशातील काही राज्यात भूतांसाठीचा उत्सव साजरा केला जातो.

दिवाळी (Diwali) हा सकारात्मक सण आहे. या सणात कुठे दीपमहोत्सव भरवले जातात, तर कुठे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम आयोजित केले जातात. लहान मुलांचा उत्साह पाहून दिवाळीचा उत्साह द्विगुणीत होतो. पण, देशातील काही राज्यात भूतांसाठीचा उत्सव साजरा केला जातो. जाणून घेऊया हा प्रकार काय आहे आणि तो कुठे साजरा केला जातो.

दरवर्षी दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. दिवाळीत जशी लक्ष्मीची पूजा करतात. तसे या दिवशी माँ कालीची पूजाही केली जाते. केवळ माँ कालीच्या नावानेच नव्हे तर यमाच्या नावानेही दिवे लावले जातात. देशात अनेक ठिकाणी अघोरी विद्या केली जाते. देशात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील अमावस्येला भूतोत्सव साजरा केला जातो.

Ghost Festival
Telangana : भाजपकडून टीआरएसच्या 4 आमदारांना 100 कोटींची ऑफर; तिघांना 15 कोटींसह पोलिसांनी घेतलं ताब्यात

कोणत्या राज्यात हा उत्सव साजरा करतात?

अयोध्या

अयोध्येतूनच दिवाळी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली आहे. लंकाधिपती रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागताला संपूर्ण अयोध्या नगरीने दिप प्रज्वलित केले होते. पण, नरक चतुर्दशीच्या दिवशी अयोध्येतील सरयू तीरावर रामाच्या घाटावर दिवे लावले जातात. येथे संध्याकाळी तांत्रिक किंवा अघोरी साधूंचा मेळावा असतो. हे अघोरी साधू भूतांना बोलावून त्यांच्याशी बोलतात. त्यांच्याकडून काम करवून घेतात, असे सांगितले जाते.

गुजरात

गुजरातमध्ये दिवाळीला एक अनोखी प्रथा पाळली जाते. दिवाळीच्या एक दिवस अगोदर घरात दिव्यापासून काजळ बनवले जाते. हे काजळ घरातील प्रत्येक सदस्य लावतात. पण, या काजळापासून अघोरी विद्या केली जाते. यात भूत पिशाचला वश करण्याची शक्ती असल्याची मान्यता आहे. गुजरातच्या पुढं समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या द्वारका शहरात तांत्रिकांकडून या पद्धतीने काजळ तयार केले जाते. अशी मान्यता आहे की, या काजळानं भूत, पिशाच्चांना आपल्या ताब्यात घेतात. नरका चतुर्दशीला हे अघोरी साधू समुद्रकिनारी गर्दी करतात.

Ghost Festival
Trupti Desai : 'त्यांना' जाऊन 24 तासही होत नाहीत तोच..; तृप्ती देसाई राजकारण्यांना म्हणाल्या 'निर्लज्ज'

पश्चिम बंगाल

नरक चतुर्दशी हा बंगालमधील नवरात्रीपेक्षा मोठा सण आहे. या दिवशी देवी कालीची पूजा केली जाते. बंगालमधील कालीघाट मंदिरात भाविकांची गर्दी असते. परंतु येथे रात्री अघोरी सिद्धी प्राप्तीसाठी मंदिराभोवती पूजा करतात. साधू अघोरी सिद्धी प्राप्तीसाठी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात विधी करतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी शेकडो अघोरी एकत्रितपणे पूजा आणि विधी करतात. सामान्य लोक याला भूत उत्सव म्हणतात.

बिहार

बिहारमधील गया जिल्ह्यातील ढुंगेश्वरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या राहुल नगर गावात बौद्ध सण उलांबना उत्सव साजरा करण्यात आला. बौद्ध धर्माच्या या महत्त्वाच्या सणाला 'भूत उत्सव' असेही म्हणतात. या दिवशी पूर्वजांचे आत्मा त्यांच्या कुटुंबाकडे परत येतात. त्यामुळे त्या भूतांसाठी अन्न पाण्याची सोय केली जाते. हे अन्न ग्रहण करून भूत तृप्त होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()