देशभरातून अनेक चित्र-विचित्र घटना समोर येत असतात. कुणासोबत कधी काय घडलं हे सांगता येत नाही. काही घटना अशा घडत असतात की, त्या वाचून ऐकून किंवा पाहून हसाव की रडावं असा प्रश्न पडतो. नुकतचं उत्तर प्रदेशमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
प्रयागराजच्या सिव्हिल लाइन्स येथील नाझरेथ हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णाच्या नाकातून डॉक्टरांनी १४ दिवस ठाण मांडून बसलेला जिवंत जळू बाहेर काढला . हे वाचून तुम्हाला धक्का बसला असले. तर हो हे खरं आहे.
उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये एका तरुणासोबत ही घटना घडली आहे. या तरुणाचं नाव सीशील मवार असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीशील आपल्या मित्रपरिवारासोबत उत्तराखंड फिरायला गेला होता.
या दरम्यान, मित्रांसह सीशीलने एका धबधब्याच्या साचलेल्या पाण्यात आंघोळ केली होती. यावेळी त्याच्या नाकात जळू गेला होता. पण त्याला यासंदर्भात काहीच जाणवलं नाही. पण घरी आल्यानंतर त्यांच्या नाकातून रक्त वाहू लागंल. असह्य वेदना होऊ लागल्या. त्यानंतर सीशीलने डॉक्टरांकडे धाव घेतली.
सीशीलने नाझरेथ हॉस्पिटलचे ईएनटी सर्जन डॉ. सुभाष चंद्र वर्मा यांना दाखवलं. त्यानंतर डॉ.वर्मा यांच्या टीमने दुर्बिणीच्या पद्धतीचा वापर करून यशस्वी शस्त्रक्रिया केली. यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा जळू तब्बल १४ दिवस तरुणाच्या नाकात होता.
डॉक्टर सुभाष चंद्र वर्मा यांनी सांगितलं की, जळू रुग्णाच्या नाकात खोलवर लपून रक्त शोषत होता. चांगली गोष्ट अशी होती की जळू नाकातून मेंदूत किंवा डोळ्यांत गेला नाही, अन्यथा गंभीर समस्या निर्माण झाली असती.
जळू नावानं परिचित असलेला का किडा खरंतर वेगळ्याच नावानं मेडिकल फिल्डमध्ये ओळखला जातो. जळूचं वैज्ञानिक नाव आहे हिरुडो मेडिसिनेलिस.
उच्चारायला आणि पचनी पडायला थोडं कठीण जरी असली तरी वेगवेगळ्या मेडिकल फिल्डमध्ये जळूचा उपयोग केला जातो. दलदलीसारख्या ठिकाणी हमखास जळू आढळतात. रक्त हा जळूचा मुख्य आहार आहे. म्हणूनच तो माणसाच्या किंवा कोणत्याही जनावराच्या शरीराला चिकटतो आणि शरीरातील रक्त शोषून घेतो.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.