Poisonous Plants: चुकूनही हे 6 रोपटे घरी किंवा ऑफसमध्ये लावू नका; ठरतील जीवघेणे...

प्रत्येक वनस्पतींचा आपल्याला फायदा होईलच असे नाही. काही वनस्पती जीवघेण्याही ठरू शकतात
Poisonous Plants
Poisonous Plantsesakal
Updated on

Poisonous Plants: झाडे किंवा वनस्पतींचा फायदा आपल्याला ताजी आणि स्वच्छ हवा देण्यासोबतच इतर अनेक गोष्टींसाठीही होतो. यातील काही झाडे आपल्याला फळे देतात तर काही वनस्पती आपल्याला भाज्या देतात. अशी अनेक झाडे आहेत, जी आपल्यासाठी औषधासारखी काम करतात, तर काही नशीबासाठी चांगली मानली जातात. मात्र प्रत्येक वनस्पतींचा आपल्याला फायदा होईलच असे नाही. काही वनस्पती जीवघेण्याही ठरू शकतात. अशाच वनस्पतींबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

अशा अनेक वनस्पती आहेत, ज्या विषारी आणि प्राणघातक आहेत. जर त्या चुकून तुमच्या संपर्कात आल्या किंवा त्यांचे सेवन केले तर आरोग्यास हानी पोहोचते, काही वनस्पतींनी माणसाचा मृत्यू देखील होऊ शकतो. यापैकी एक वनस्पती अशी आहे की जिने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या आईचा बळी घेतला.

त्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये कोणतेही रोप लावण्यापूर्वी त्याबद्दल थोडे संशोधन नक्कीच करा. आज आम्ही तुम्हाला अशाच 6 विषारी वनस्पतींबद्दल सांगत आहोत, ज्यापासून अंतर राखणे केव्हाही चांगले असते. यामध्ये अशा काही वनस्पतींचा समावेश आहे, ज्या तुमच्या बागेत किंवा जवळपास असू शकतात.

Poisonous Plants
आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

व्हाइट स्नेकरूट - व्हाइट स्नेकरूट ही अत्यंत विषारी वनस्पती मानली जाते. या वनस्पतीला लहान पांढरी फुले येतात. एनसीबीआयच्या अहवालानुसार, यामध्ये विषारी अल्कोहोल ट्रेमेटॉल आढळले आहे. मानवी शरीरात चुकूनही या वनस्पतीचा अंश गेल्यास विष पसरते.

ऑलिएंडर वनस्पती - ही वनस्पती कनेरा म्हणून ओळखली जाते. या वनस्पतीमध्ये घातक कार्डियाक ग्लायकोसाइड्स आढळतात, ज्यामुळे उलट्या, चक्कर येणे, लूज मोशन आणि कोमा होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर याच्या पानांच्या स्पर्शाने शरीरात खाज सुटू लागते. याच्या फुलांच्या रसापासून बनवलेले मध माणसाला आजारी पाडू शकतं.

रोजरी पी - ही वनस्पती प्रामुख्याने जंगलात आढळते. एनसीबीआयच्या अभ्यासानुसार, त्याच्या मध्यभागी दिसायला अतिशय सुंदर अब्रीन आढळते, जे एक घातक राइबोसोम इनहिबिटरी प्रोटीन आहे. प्रार्थनेसाठी वापरल्या जाणार्‍या दागिन्यांमध्ये आणि हारांमध्ये याचा वापर केला जातो. ते चघळणे आणि स्क्रॅच करणे घातक ठरू शकते. कारण 3 मायक्रोग्रॅम एब्रिन कोणत्याही माणसाचा जीव घेण्यास पुरेसं ठरते.

एरंडीच्या बिया - या अतिशय विषारी असते, त्यातून एरंडेल तेल काढले जाते. भारताच्या अनेक भागांत एरंडीच्या बिया आढळतात. ही एक जंगली वनस्पती आहे आणि ती कुठेही वाढू शकते. एरंडीच्या बिया इतक्या विषारी असतात की थोड्या प्रमाणातही माणसाचा जीव जाऊ शकतात. त्यात रिसिन नावाचे विष असते जे पेशींच्या आत प्रोटीनचे सर्क्युलेशन थांबवते.

Taxus baccata नावाचं हे वृक्ष युरोप, आफ्रिका आणि आशिया या सर्व प्रदेशात आढळते. त्यावर एक अतिशय सुंदर लाल रंगाचे फळ दिसते. ही वनस्पती दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच ती धोकादायक आहे. याच्या बियांव्यतिरिक्त संपूर्ण वनस्पतीमध्ये 'टॅक्सीन' नावाचे विष आढळते. या विषाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा काही क्षणात मृत्यू होऊ शकतो.

डेडली नाईटशेड - हे झाड देखील खूप धोकादायक आहे. ट्रॉपीन आणि स्कोपोलामाइन विष त्याच्या देठ, पाने, बेरी आणि मुळांमध्ये सर्वत्र आढळून येते. याच्या सेवनामुळे शरीरातील अनैच्छिक स्नायू स्थिर होतात. त्यामुळे शरीरात पक्षाघात होतो.

डिस्क्लेमर - हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()