Henley Passport Index : व्हिसा नसेल तरी चालेल, भारतीयांना या 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरण्याची मुभा

सलग 5 वर्षे अव्वल स्थानावर असलेला जपानी पासपोर्ट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय.
Passport
Passport sakal
Updated on

हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये सिंगापूरचा पासपोर्ट यावर्षी वरचढ ठरलात. त्यामुळे इथल्या लोकांना जगातील 227 देशांपैकी 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे. सलग 5 वर्षे अव्वल स्थानावर असलेला जपानी पासपोर्ट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. जपानी पासपोर्ट असेल तर 189 देशांमध्ये व्हिसा मुक्त प्रवास करण्यास परवानगी मिळते.

विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत भारताच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. गेल्या वर्षी आपण 85 व्या क्रमांकावर होतो. आता यावर्षी आपण 80 व्या क्रमांकावर पोहोचलोय.

अशा स्थितीत प्रश्न पडतो की पासपोर्ट शक्तिशाली कसा ठरतो, त्याचा अर्थ काय होतो, त्याचे रँकिंग कसे ठरवले जाते आणि भारताचे रँकिंग कशामुळे सुधारले?

पासपोर्ट शक्तिशाली असणे म्हणजे काय?

तर हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, एखाद्या देशाच्या पासपोर्टच्या शक्तिशाली असण्याचा अर्थ असा होतो की तेथील लोक व्हिसाशिवाय सर्वाधिक देशांमध्ये प्रवास करू शकतात.

उदाहरणार्थ, सिंगापूरचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली आहे त्यामुळे इथले लोक व्हिसाशिवाय जास्तीत जास्त 192 देशांमध्ये प्रवास करू शकतात. त्याचप्रमाणे जर्मनी, इटली आणि स्पेन हे देश दुसऱ्या क्रमांकावर आहेत त्यामुळे इथले लोक 190 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकता.

पासपोर्टची क्रमवारी कशी ठरवली जाते?

पासपोर्ट रँकिंग तयार करण्याचे काम लंडनस्थित इमिग्रेशन कन्सल्टन्सी हेन्ली अँड पार्टनर्स करते. ही संस्था दरवर्षी रँकिंग जाहीर करते. रँकिंग कोणत्या आधारावर ठरवले जाते, आता तेही समजून घेऊ.

इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने जारी केलेल्या डेटावर हेन्ले अँड पार्टनर्स कन्सल्टन्सीची पासपोर्ट रँकिंग आधारित आहे. रँकिंगसाठी अनेक घटक जबाबदार असतात. जसं की, एखाद्या देशाने दुसऱ्या देशातील लोकांना व्हिसाशिवाय प्रवेश दिला, तर त्या अतिथी देशाला 1 गुण दिला जातो. व्हिसा ऑन अरायव्हल आणि परदेश प्रवास आणि देशांचे परस्पर संबंध असे अनेक घटक याला कारणीभूत असतात. जे तुमच्या देशाचे पासपोर्ट रँकिंग मजबूत करतात.

याशिवाय, प्रत्येक देशात व्हिसासाठी वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे आहेत, ज्या देशाची पूर्तता होईल त्याला व्हिसा सहज मिळतो. कोणते देश ही मागणी पूर्ण करण्यास सक्षम आहेत? हा घटक निर्देशांकाच्या क्रमवारीतही महत्त्वाची भूमिका बजावतो.

भारताची क्रमवारी कशी सुधारली?

भारताबद्दल बोलायचं झालं तर, आपला पासपोर्ट हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये 80 व्या क्रमांकावर आहे. भारतीय व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हलद्वारे जगातील 57 देशांमध्ये प्रवास करू शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताचे इतर देशांशी चांगले संबंध आणि वाढत्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती ही भारतीय पासपोर्ट मजबूत होण्याची प्रमुख कारणं आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.