Potato : बाबो! सोन्याच्या भावाने विकला जाणारा बटाटा, जगातील 'या' महागड्या बटाट्यात आहे तरी काय?

म्ही जगातल्या सगळ्यात महागड्या बटाट्याबाबत ऐकलंत का?
Expensive Potato
Expensive Potato esakal
Updated on

Potato : एक किलो बटाट्याची किंमत ही साधारण ३०-५० रुपयांच्या घरात असते. मात्र तुम्ही जगातल्या सगळ्यात महागड्या बटाट्याबाबत ऐकलंत का? कालचा बाजारभाव तुम्ही बघितलात तर12 एप्रिल 2023 पर्यंत, जलपाईंगुडीमध्ये सर्वात स्वस्त बटाटा 7 रुपये तर सर्वात महाग बटाटा 60 रुपये/किलो होता.

बटाट्याचीही अशी विविधता जगात आहे, जी सोन्याच्या भावाने विकली जाते. मात्र येथे एक किलो बटाट्यासाठी तुम्हाला ₹40,000-50,000 खर्च करावे लागतील. बटाट्याच्या या दुर्मिळ जातीचे नाव 'Le Bonnotte potato' आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ प्रजाती असून, वर्षातून फक्त 10 दिवस उपलब्ध असते. ही प्रजाती फ्रान्समधील इले डी नॉयरमाउटियर बेटावर दिसून येते.

Expensive Potato
Expensive Potato

हा बटाटा एवढा महागडा का?

याची एवढी किंमत यासाठीसुद्धा आहे कारण, हे बटाटे केवळ ५० स्केअर मीटर परिसरात लावले जातात. याला खतपाण्याच्या रुपात समुद्रातील शेवाळ मुळाशी टारका जातो. त्यामुळे हा जगातील सगळ्यात महागडा बटाटा आहे. (World)

Expensive Potato
Sweet Potato Benefits : तुमच्या ब्युटी अन् ब्रेनसाठी ठरतं सुपरफूड

या बटाट्याची चव कशी असते?

ले बोनॉट बटाट्याला (Potato) लिंबूची चव आहे तसेच थोडासा खारटपणा आणि नटी चव आहे, ज्यामुळे तो बटाट्याच्या इतर प्रकारांपेक्षा वेगळा बनतो. हे वैयक्तिकरित्या दरवर्षी फक्त एका आठवड्यासाठी उपलब्ध असतात. हे बटाटे त्वचेसह खाण्यासाठीही वापरले जाते. बेटावरील एकूण 10,000 टन बटाटा पिकांपैकी केवळ 100 टन लागवडीत ला बोनेट बटाटे आहेत, ज्यामुळे त्याची किंमत एवढी जास्त आहे. हे दुर्मिळ बटाटे काळजीपूर्वक निवडण्यासाठी सुमारे 2,500 लोक सात दिवस मेहनत करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.