Trending News: जगातला एक अजब परिवार; प्राण्याप्रमाणे चार पायांवर चालतात माणसं; काय आहे इथलं रहस्य?

हा परिवार सामान्य माणसांप्रमाणे दोन पायांवर चालत नाही, तर प्राण्यांप्रमाणे चार पायांवर चालतो. या परिवारातले लोक आपल्या दोन्ही हातांचा वापर पायाप्रमाणे करतात.
Trending News
Trending NewsSakal
Updated on

जगभरात वेगवेगळ्या प्रकारची कुटुंबे आढळतात. काही परिवार इतके विचित्र काहीतरी करतात, त्यामुळे त्यांची जोरदार चर्चा होते. असाच एक परिवार सध्या चर्चेत आला आहे. याचं कारण म्हणजे हा परिवार सामान्य माणसांप्रमाणे दोन पायांवर चालत नाही, तर प्राण्यांप्रमाणे चार पायांवर चालतो. या परिवारातले लोक आपल्या दोन्ही हातांचा वापर पायाप्रमाणे करतात.

हे कुटुंब तुर्कीमधल्या दूरदराज या गावामध्ये राहतं. या कुटुंबामधल्या पाच भावाबहिणींबद्दल २००० त्या दशकामध्ये शोधनिबंधही प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर सविस्तरपणे अभ्यास करण्यात आला आहे. हा पेपर प्रसिद्ध झाल्यानंतर काही वर्षांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील मानसोपचार विषयातले प्राध्यापक निकोलस हम्फ्रे या कुटुंबाला भेटण्यासाठी तुर्कीला गेले.

Trending News
Trending News: युरोपातलं सर्वात जुनं गाव सापडलं; ८००० वर्षांपूर्वी होती लोकवस्ती

तुर्कीतल्या या उलास कुटुंबामधल्या आई- वडिलांना १८ मुलं होती. पण यापैकी केवळ ६ जण असे आहेत, ज्यांना प्राण्यांप्रमाणे चार पायांवर चालण्याची इच्छा आहे. ही अशी गोष्ट होती की जी या आधी कधी पाहण्यात आली नव्हती. या परिवारावर एक डॉक्युमेंट्रीही बनवण्यात आली होती. ही ६० मिनिटांची डॉक्युमेंट्री ऑस्ट्रेलियामध्ये बनवण्यात आली. प्राध्यापक हम्फ्रे यांनी सांगितलं की त्यांनी कधी असा विचारही केला नव्हता की या आधुनिक युगामध्ये कोणताही माणूस पशु अवस्थेत परत जाईल. (Trending News)

हम्फ्रे पुढे म्हणाले की, जी गोष्ट माणसांना प्राण्यांपासून वेगळं ठरवते, ती गोष्ट म्हणजे मानवाचं दोन पायांवर चालणं. डोक्याला वरच्या बाजूला ठेवणं. याशिवाय भाषा आणि इतरही काही घटक महत्त्वाचे आहेत. पण या परिवारातल्या ६ जणांनी मात्र अगदीच विचित्र गोष्ट केली आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये उलास कुटुंबाला माणूस आणि वानर यांच्यामधली अवस्था असं संबोधण्यात आलं आहे. या अवस्थेचं अस्तित्व आता राहता कामा नये, असंही यात म्हटलं आहे. पण त्यांच्या या चालण्याच्या पद्धतीमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Trending News
Trending News: अशी शाळा जिथं विद्यार्थी आणि प्राणी एकत्रच शिकतात; नक्की काय आहे प्रकरण?

काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असं काही अनुवंशिक समस्येमुळे होऊ शकतं. या सहा भाऊ बहिणींपैकी पाच जण सध्या जिवंत आहेत. यांचं वय २२ ते ३८ वर्षांच्या आसपास आहे. हे सर्वजण मेंदूच्या विकाराने पीडित आहेत. डॉक्टरांनी एमआरआयचे रिपोर्ट्सही या डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवले आहेत. यावरुन लक्षात येत आहे की या पाचही जणांच्या मेंदूचा एक भाग थोडासा अविकसित आहे. या अवस्थेला सेरेब्रल वर्मिस असं म्हटलं जातं.

पण याचा अर्थ असा नाही की हे लोक प्राण्यांप्रमाणे चार पायांवर चालू लागतील. कारण सेरेब्रल वर्मिस असलेले लोक इतर माणसांप्रमाणे दोन पायांवरच चालतात. पण याउलट या कुटुंबातले लोक आपल्या दोन्ही हातांचा उपयोग आपल्या पायाप्रमाणे करतात. या कुटुंबावर इतरही अनेक डॉक्युमेंट्री तयार झालेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.