जिल्हाधिकाऱ्यांसमोर लोटांगण! बळकावलेली जमीन मिळवण्यासाठी वृद्ध शेतकऱ्यावर आली वाईट वेळ; Video होतोय व्हायरल

Farmer rolls on floor Viral Video : मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील कलेक्टर ऑफिसमध्ये लोटांगणे घेत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Farmer rolls on floor with folded hands before district magistrate video goes viral
Farmer rolls on floor with folded hands before district magistrate video goes viral
Updated on

मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील कलेक्टर ऑफिसमध्ये लोटांगणे घेत असलेल्या एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सध्या सोशल मीडियावर एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा वृद्ध एका सरकारी कार्यालयात लोटांगणे घेत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ, मध्य प्रदेशमधील मंदसौर येथील असल्याचे सांगितले जात आहे. येथील साप्ताहिक जनसुनावणीच्या वेळी सखतली गावातील एक वृद्ध व्यक्ती कलेक्टर ऑफिसमध्ये लोटांगणे घेत पोहोचला आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपला अर्ज सादर केला.

हे प्रकरण जमीन बळकावण्याचं असून, त्यात जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारून थकलेल्या व्यक्तीने अखेर लोटांगण घालत जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. या आधी वृद्धाच्या मागण्या ऐकून न घेतल्याने या वृद्धेने जिल्हाधिकारी कार्यालयात लोंटागणे घेत जिल्हाधिकारी दिलीप यादव यांच्याकडे न्यायाची याचना करत आपला अर्ज सादर केला.

Farmer rolls on floor with folded hands before district magistrate video goes viral
Dubai Princess News : "डियर हसबंड....", दुबईच्या राजकुमारीने चक्क इंस्टाग्रामवर दिला तलाक; पोस्ट होतेय व्हायरल

मंदसौर जिल्हाधिकारी कार्यालयात लोटांगणे घेत जनसुनावणी कक्षात पोहोचलेल्या वृद्धाचे नाव शंकरलाल पाटीदार असे असून 65 वर्षीय व्यक्तीचे म्हणणे आहे की, तो 2010 पासून आपल्या जमिनीसाठी लढत आहे पण कोणीही त्याचे म्हणणे ऐकून घेत नाही. त्यांनी राष्ट्रपतींपासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळीकडं न्याय मागितला. मात्र त्याच्या प्रकरणाची सुनावणी होत नाही. कलेक्टर ऑफिसमध्येही त्यांनी 25 हून अधिक वेळा अर्ज सादर केले आहेत.

Farmer rolls on floor with folded hands before district magistrate video goes viral
Sakal Podcast : पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण स्थगित ते 'के ड्रामा' पाहिल्याने 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या

नेमकं प्रकरण काय आहे?

शंकरलाल यांचे वडील फूलचंद्र हे पाटीदार गाव साखतली येथील रहिवासी आहेत. सुरखेडा तहसील सीतामऊ गावात त्यांची जमीन आहे. प्रकरण 14 वर्षे जुने असून सुमारे 9 बिघे जमीन, जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात अधिकारी देशमुख यांनी त्यांची मुलगी अश्विनी देशमुख यांच्या नावे फसवणूक करून हस्तांतरित केली आहे. ज्यासाठी ते 2010 पासून लढा देत आहेत. या जमिनीवर वर्षानुवर्षे शेती करत असल्याचे वृद्ध सांगतात. आता त्या लोकांनी फसवणूक करून माझी जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आहे. आता त्यांना गुंडच्या मदतीने जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. गुंड त्यांना रोज धमक्या देतात आणि जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या भीतीमुळे मला रात्री झोपही येत नाही असेही या वृद्धाने सांगितले. इतकेच नाही तर या वृद्धाने त्यांचा खून होण्याची भीती देखील व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.