नवी दिल्ली : भारतात सध्या राजधानी दिल्ली आणि परिसरात किमान आधारभूत किंमतीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांना दिल्ली शहरात प्रवेश करता येऊ नये यासाठी बॅरकेटिंग करुन मोठे अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. पण अशा प्रकारे शेतकरी आंदोलन केवळ भारतातच नव्हे तर युरोपातील अनेक देशांमध्ये सुरु आहे. (farmers protests not just India these european countries witnessing too)
युरोपियन देशांमध्येही विविध मागण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत. यामध्ये चांगलं उत्पन्न आणि परदेशी स्पर्धकांपासून संरक्षणाची मागणी करण्यात आली आहे. जर्मनीमधील कृषी डिझेलवरील कर सूट आणि इतर युरोपियन राष्ट्रांमधील पर्यावरणीय नियमांमुळं निर्माण झालेली आव्हानं यासाठी देखील शेतकरी आंदोलन करत आहेत.
कुठल्या देशात सुरुएत शेतकरी आंदोलनं?
1) फ्रान्स - गेल्या महिन्यात २९ जानेवारीला संपूर्ण फ्रान्स आणि पॅरिसजवळील हायवे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर्सद्वारे ब्लॉक केला होता. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारनं दिलेल्या सवलतींमुळं शेतकरी संघटना सुधारित वेतन, कमी नोकरशाही आणि परदेशी स्पर्धेपासून संरक्षण यासाठी लढा देत आहेत. 31 जानेवारी रोजी पॅरिसमधील फूड मार्केटबाहेर आंदोलन केल्यामुळे 90 हून अधिक शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
२) जर्मनी - 8 जानेवारी रोजी, जर्मन शेतकऱ्यांनी सबसिडी कपातीविरोधात आठवडाभर देशव्यापी आंदोलन केलं होतं. कृषी डिझेलवरील कर सूट टप्प्याटप्प्यानं बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं. (Latest Marathi News)
३) स्पेन - 6 फेब्रुवारी रोजी, स्पॅनिश शेतकऱ्यांनी अधिकृतपणं देशव्यापी निदर्शनं सुरू केली आणि डझनभर महामार्गांवर चक्का जाम केला होता. 10 फेब्रुवारी रोजी त्यांच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलं होतं. (Marathi Tajya Batmya)
४) इटली - युरोपियन युनियनच्या कृषी धोरणांसह कृषी क्षेत्रासाठी कमी तरतूद केल्याच्या निषेधार्थ इटलीमधील शेतकऱ्यांनी राजधानी रोमच्या रिंग रोडवर आंदोलन केलं. संपूर्ण युरोपमध्ये विरोध दर्शवताना, इटलीतील शेतकऱ्यांनी सॅनरेमो सॉन्ग फेस्टिव्हलला विरोध करण्यासाठी रात्रभर आपले ट्रॅक्टर लिगुरियातील फ्लोरेस शहरात नेऊन ठेवले होते.
५) बेल्जिअम - ट्रॅक्टर चालवणाऱ्या शेकडो संतप्त शेतकऱ्यांनी ब्रुसेल्समध्ये प्रवेश केला आणि वाढीव कर आणि वाढत्या खर्चाविरोधात युरोपियन संसदेसमोर निदर्शने केली. या शेतक-यांची निदर्शनं ही शेतीला अधिक शाश्वत करण्यासाठी होती तसेच युक्रेनमधून धान्य निर्यातीवरील कोटा उठवण्याच्या 27 सदस्यीय गटाच्या निर्णयाविरोधाती हे आंदोलन होतं.
६) पोलंड - पोलंडमधील शेतकरी EU पर्यावरणीय धोरणं आणि गैर EU राष्ट्रांकडून अयोग्य स्पर्धेविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. पोलिश शेतकऱ्यांनी 12 फेब्रुवारी रोजी युरोपियन युनियनच्या शेती धोरणांच्या निषेधार्थ 30 दिवसांचा संप पुरकारला आहे. (Latest Maharashtra News)
७) ग्रीस - इथला शेतकऱ्यांनी मध्य आणि उत्तर ग्रीसमध्ये नाकेबंदी केली आहे. युरोपच्या इतर भागांतील शेतकऱ्यांचा त्यांनी निषेध नोंदवला आहे. सरकारनं त्यांना उच्च ऊर्जेच्या किंमती आणि हवामान बदलाच्या वाढत्या प्रभावाचा सामना करण्यास मदत न केल्यास कारवाई वाढवण्याची धमकी दिली आहे. 2 फेब्रुवारी रोजी, ग्रीक सरकारनं शेतकऱ्यांच्या ऊर्जेच्या खर्चासाठी मदत करण्याचे वचन दिलं, ज्यात कृषी डिझेलसाठी कर सवलत एक वर्षाची मुदतवाढ यांचा समावेश आहे.
८) रोमानिया - उत्पादनांच्या कमी किंमती, वाढता खर्च, स्वस्त खाद्यपदार्थांची आयात आणि हवामान बदलाशी लढा देण्यासाठी या देशातही शेतकऱ्यांनी आंदोलनं केली आहेत. रोमानियात, शेकडो शेतकरी आणि ट्रक ड्रायव्हर्सनी तीन आठवड्यांपूर्वी राजधानी बुखारेस्टसह मोठ्या शहरांजवळील राष्ट्रीय रस्त्यांवर ट्रॅक्टर आणि ट्रक्स आणून निषेध नोंदवायला सुरुवात केली.
९) लिथुअनिआ - कृषी धोरणांवर नाराज असलेले शेतकरी 23 जानेवारी रोजी राजधानी विल्निअस इथं आपल्या ट्रॅक्टर्ससह आंदोलन केलं. आंदोलकांनी सहा प्रमुख मागण्या सरकारकडं मांडल्या. यामध्ये लिथुआनियामार्गे रशियन धान्याची वाहतूक थांबवण्याच्या मागणीचा समावेश आहे. युरोपियन युनियनने रशियन खाद्यपदार्थांवर निर्बंध घातले नसल्यामुळं, त्यांची धान्य निर्यात कमी झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. गवताळ प्रदेशाचा प्रश्नही सोडविण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.