Man on Moon Video : "चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय, 21 तोफांची सलामी"; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचलं आहे
Video Viral
Video ViralSakal
Updated on

भारताने चांद्रयान मोहीम राबवली असून दोन दिवसांत लँडर विक्रम चंद्रावर पोहोचेल. चांद्रयान २ ही भारताची महत्त्वकांक्षी मोहीम अयशस्वी ठरली, त्यानंतर भारताचे हे मोठे पाऊल असेल. भारत यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश असेल. पण सध्या एक विनोदी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडिओ फेसबुकवरून शेअर करण्यात आला असून "चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला भारतीय, 21 तोफांची सलामी" असं कॅप्शन टाकून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर यामध्ये एक अंतराळवीर चंद्रावर चालत असल्यासारखं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Video Viral
Video Viral : No Parkingमधील वाहने उचलणाऱ्या गाडी चालकाकडे ना लायसन्स, ना परवानगी? ठाण्यातील प्रकार

व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळतं की, हा व्हिडिओ एका रस्त्यावरील असून रस्त्याने रिक्षा आणि गाड्या जात आहेत. रस्त्यावरील खड्डे चंद्रावरील खड्ड्यासारखे दिसत आहेत. तर या व्यक्तीने अंतराळवीरांसारखे पोषाख परिधान केला आहे. त्यामुळे सुरूवातील हा व्हिडिओ चंद्रावरील असल्याचा भास आपल्याला होतो.

दरम्यान, चांद्रयान आता चंद्राच्या पृष्ठभागाच्या अगदी जवळ पोहोचलं असून त्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर हा व्हिडिओ नेटकऱ्यांकडून शेअर केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.