कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोक्यावर नोकरीचा टांगती तलवार असते. काम केल्याशिवाय पोटाची खळगी कशी भरणार असा प्रश्न प्रत्येक कर्मचाऱ्यासमोर पडलेला असतो. पण या गोष्टीला एक फ्रेंच महिला अपवाद ठरली आहे. एका फ्रेंच महिलेने आपल्याच कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. कंपनी तिला कोणतेही काम न देता 20 वर्षांपासून पगार देत असल्याचे महिलेने म्हटले आहे. तुम्ही म्हणाल घ्यायचा ना फुकटचा पगार, कशाला तक्रार वगैरे करत बसायच? पण नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात.
अर्धांगवायूने त्रस्त असलेल्या फ्रान्सच्या लॉरेन्स व्हॅन वासेनहोव्ह यांनी सांगितले की, 1993 मध्ये फ्रान्स टेलिकॉमने मला जॉब दिला. ऑरेंजने फ्रान्स टेलिकॉमचे अधिग्रहण केले तेव्हा लॉरेन्स यांची नोकरी सुरूच होती, परंतु काही गोष्टी पूर्णपणे बदलल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आरोग्याच्या समस्या असूनही, व्हॅन वासेनहॉव्ह यांनी सुरुवातीला कंपनीमध्ये एचआर आणि सेक्रेटरीसह अनेक पदावर काम केले आहे.
2002 मध्ये, त्यांनी दुसऱ्या विभागात हलवण्याची विनंती केली, परंतु नवीन कामाचे पद त्यांच्यासाठी योग्य नव्हते. दरम्यान, ऑरेंजने मोठा निर्णय घेत त्यांना काम देणे बंद केले पण पूर्ण पगार देणे सुरूच ठेवले. कंपनीने दिलेली ही वागणुक एक षडयंत्र असल्याचे लॉरेन्स यांचे म्हणणे आहे. नोकरी सोडण्यास भाग पाडण्याचा एक मार्ग असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
कंपनीच्या या वागणुकीमुळे त्यांना नेहमीच एकटेपणा जाणवत होता आणि त्या तणावात होत्या. या भेदभावाविरुद्ध लढा देण्यासाठी 2015 मध्ये त्यांनी हा मुद्दा सरकार आणि उच्च अधिकाऱ्यांकडे मांडला. यानंतर ऑरेंजने एक मध्यस्थी आणला पण परिस्थितीत सुधारणा झाली नाही.
लॉरेन्सने हा अनुभव असह्य असल्याचे म्हटले आहे. कोणतेही काम न करता घरी राहण्यासाठी पगार मिळणे हे खूप मोठे ओझे आहे. आपला वेळ वाया गेला आहे आणि व्यावसायिक क्षमता कमी झाली आहे, त्यामुळे कायद्याचा आधार घ्यावा लागला अशी भावना त्यांना व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.