General Knowledge : पेंट हाऊस म्हणजे काय? फ्लॅट, बंगला अन् पेंटहाऊसमध्ये काय फरक असतो माहितीये?

पेंटहाऊस म्हणजे नक्की काय किंवा फ्लॅट, बंगला अन् पेंटहाऊस यांच्यातील फरक काय याबाब तुम्हाला माहिती आहे काय?
General Knowledge
General Knowledgeesakal
Updated on

General Knowledge : पेंटहाऊस हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असेल. टीव्ही सेलिब्रिटीचं अमुक ठिकाणी पेंटहाऊस आहे अशा बातम्याही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे हा शब्द आपल्या सगळ्यांच्या परिचयाचाच आहे. परंतु पेंटहाऊस म्हणजे नक्की काय किंवा फ्लॅट, बंगला अन् पेंटहाऊस यांच्यातील फरक काय याबाब तुम्हाला माहिती आहे काय? चला तर याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.

General Knowledge
Shahrukh Khan Bunglow: शाहरुखच्या अलिबागमधील बंगल्याजवळ सापडला अजगर

बंगला म्हणजे काय?

ज्या घराखालील जमिन मालकाची असते त्याला बंगला म्हणतात. तो एक किंवा अधिक मजली असू शकतो. त्याच्या तळापासून गच्चीपर्यंत मालक एकच असतो. या ठिकाणी भाडेकरूही असू शकतात मात्र बंगला हा सहसा मालकाचं स्वतंत्र असं भव्य घर असतं.

फ्लॅट किंवा अपार्टमेंट (सदनिका)

हे एक असे घर असते. ज्याचे मर्यादित क्षेत्रफळ राहणाऱ्यांच्या मालकीचे असते. एका इमारतीत अनेक फ्लॅट असतात. बांधकामाच्या प्रमाणात त्यापैकी काही क्षेत्र सामायिक असते. फ्लॅट तळमजल्यावर असला तरीसुद्धा तिच्या खालची जमीन फ्लॅट धारकाच्या व्यक्तिगत मालकीची असत नाही. त्यावर सामुहिक मालकी असते. (Flat)

पेंटहाऊस म्हणजे काय?

हे एक असे घर असते जे सर्वात वरच्या मजल्यावर असते आणि त्यात काही विशेष सोयीसुविधा दिल्या असतात. त्याला पेंटहाऊस असं म्हणतात. सेलिब्रिटींकडे असे बरेच पेंटहाऊस तुम्हाला दिसून येतील. त्याची बरीच चर्चाही सोशल मीडियावर दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()