Interesting Train Facts : बाबो! एवढं असतं रेल्वेच्या चाकाचं वजन? कधीतरी उचलायला जाल आणि...

Train wheel weight: रेल्वेचं ट्रकसारखं नसतं, वेगळ्या डब्याला असतात वेगळी चाकं?
Interesting Train Facts
Interesting Train Factsesakal
Updated on

Interesting Facts about Train : रेल्वे भारतातल्या प्रत्येक लहान मुलाला देखील ओळखीची वाटते. कारण, अगदी आपल्या अंगाई गाण्यातही रेल्वेच्या गाडीचा उल्लेख असतो. हीच गाण्यातली रेल्वे आता मोठ्या शहरांतील लोकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. मुंबई सारख्या ठिकाणी तर रेल्वे बंद असली की लोकांना सुट्टी मिळते.

रेल्वेतून प्रवास करायला कोणाला आवडत नाही. ट्रेनमध्ये कंटाळा आलेला क्वचितच कोणी असेल. पण, रेल्वेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय रेल्‍वेबद्दल अशी माहिती देणार आहोत. जिच्‍याबद्दल तुम्‍हाला क्वचितच माहिती असेल.

Interesting Train Facts
General Knowledge : तुम्हाला OK चा फुल फॉर्म माहितेय? रोज हा शब्द वापरणाऱ्या 99% लोकांना माहिती नाही

ही माहिती रेल्वेच्या चाकाला जोडलेली असते. हे बघायला खूप जड वाटतं, पण त्याचं वजन किती आहे हे लोकांना कळत नाही. प्रवासी घेऊन जाण्याबरोबरच भारतीय रेल्वे मालवाहतूक वाहक म्हणूनही काम करते.

हजारो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेणाऱ्या रेल्वेच्या चाकाचे वजन किती असते, हे कधी तुमच्या मनात आले आहे का? याबद्दलच आज जाणून घेऊयात.

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) नुसार, ट्रेनचे इंजिन आणि कोच वेगवेगळ्या वजनाची चाके बसवलेले आहेत. त्याचे वेगवेगळ्या डब्यानूसार वेगवेगळे वजन असते. नक्की हा काय विषय आहे पाहुयात.

रेल्वेची चाकं तयार होताना
रेल्वेची चाकं तयार होतानाesakal
Interesting Train Facts
General Knowledge : दररोज वापरणाऱ्या मोबाईलचा फुल फॉर्म तुम्हाला माहितेय?

एलएचबी कोच

लाल रंगाच्या एलएचबी कोचच्या एका चाकाचे वजन अंदाजे 326 किलो असते. तर, ब्रॉडगेजवर धावणाऱ्या सामान्य गाड्यांच्या डब्यात बसवलेल्या चाकाचे वजन 384 ते 394 किलो इतके असते. तर, ईएमयू ट्रेनमध्ये डब्यातील एका चाकाचे वजन सुमारे 423 किलो असते.

इंजिनाच्या चाकाचे वजन वेगळे असते?

इंजिनच्या चाकाचे वजन डब्यांपेक्षा वेगळे असते. इंजिनमध्ये बसवलेल्या चाकाचे वजन डब्यांपेक्षा जास्त असते. हे सर्वज्ञात सत्य आहे की इंजिनचे वजन जास्त आहे म्हणून त्याच्या चाकाचे वजन देखील जास्त आहे. नॅरो गेज ट्रेन इंजिनच्या एका चाकाचे वजन 144 किलो आहे. मीटर गेजवर चालणाऱ्या इंजिनच्या एका चाकाचे वजन 421 किलो असते.

इतके वजन असूनही रेल्वेचे चाक घसरते
इतके वजन असूनही रेल्वेचे चाक घसरते esakal
Interesting Train Facts
General Knowldge : वेळपुढे वापरल्या जाणाऱ्या 'AM' अन् 'PM' चा फुल फॉर्म माहितीये का?

डिझेल इंजिनच्या एका चाकाचे वजन सुमारे 528 किलो असते. त्याच वेळी, इलेक्ट्रिक इंजिनच्या एका चाकाचे वजन 554 किलो आहे. या रेल्वेचे चाक एखाद्याच्या अंगावर पडले तर त्याची अनेक हाडे तुटण्याची शक्यता असते. त्यामुळेच कधी रेल्वेचं चाक दिसलं तर उचलायचं धाडस करू नका.  

Interesting Train Facts
General Knowledge : दररोज वापरणाऱ्या 'Bye' शब्दाचा फुल फॉर्म माहितीये? 99 टक्के लोकांना माहिती नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()