'Google चा फोकस हाललाय...' टीकास्त्र सोडत माजी गूगल कर्मचाऱ्याकडून कंपनीची पोलखोल

प्रवीण शेषाद्री यांनी Google च्या वर्क कल्चर आणि मॅनेंजमेंटर टीका करणारी एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे.
Google
Googleesakal
Updated on

Ex Employee Blamed On Google : गूगलचा फोकस हाललाय, गूगलचे व्यवस्थापनही गंडलेय अशी टीका सध्या गूगलवर होताना दिसतेय. गूगल अनेक दिवसांपासून खूप चर्चेत आहे. अलीकडेच कंपनीने 12 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यानंतर कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांनी लिंक्डइनवर मोर्चा उघडून आपली व्यथा मांडली. आता एक माजी Google कर्मचारी, प्रवीण शेषाद्री यांनी Google च्या वर्क कल्चर आणि मॅनेंजमेंटर टीका करणारी एक ब्लॉग पोस्ट लिहिली आहे.

शेषाद्री हे Appsheet नावाच्या स्टार्टअपचे संस्थापक होते, जे 2020 च्या सुरुवातीला Google Cloud ने विकत घेतले होते. ते अगदी सुरुवातीपासूनच कंपनीचा एक भाग बनले होते.

शेषाद्री म्हणाले, कंपनीने त्याचा व्हिजनच गमावलाय. त्यामुळे मी आता गूगलसाठी काम करत नाही. एक काळ होता जेव्हा गूगल एक प्रसिद्ध कंपनी होती. मात्र हळू हळू या कंपनीने दर्जेदार काम देणे बंद केले आहे. मी आठ वर्ष या कंपनीत काम केलेय. त्यामुळे मी हक्काने सांगू शकतो की मी यूजर्सची सेवा केली आहे. मात्र बरेच कर्मचारी आज असे करताना दिसत नाहीये.

गूगलच्या चार मोठ्या समस्या

पुढे शेषाद्री म्हणतात, गूगलची मुख्य समस्या त्यांच्या तंत्रज्ञानात नसून त्याच्या वर्क कल्चरमध्ये आहे.

शेषाद्री म्हणाले, “ज्या प्रकारे मी ते पाहतो, Google वर्क कल्चरच्या चार मुख्य समस्या म्हणजे “जाहिराती हे त्यांचे पैसे छापण्याचे यंत्र बनले आहे. त्यामुळे त्यांच्या इतर गोष्टी उघडपणे पुढे येत नसल्या तरी त्यांची वाढ झपाट्याने होणारी प्रगती दिसून येते.

गुगल इथेचं चुकतंय असं शेषाद्री म्हणाले,

(१) मिशन नाही, (२) गांभीर्य कळत नाही, (३) एक्सेप्शनॅलिझम (४) गैरव्यवस्थापन

Google कमेंट रिक्वेस्टलासुद्धा त्वरीत रिस्पाँड करत नाही

शेषाद्री म्हणतात की बहुतेक कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्याचे काम करण्याऐवजी, शेवटी इतर Google कर्मचार्‍यांना सेवा देतात. त्यांनी कंपनीचे वर्णन एक "बंद जग" म्हणून केले आहे जेथे अतिरिक्त परिश्रमाचे मोल नाही. शेषाद्री म्हणाले फीडबॅकसुद्धा "तुमचे सहकारी आणि व्यवस्थापक तुमच्या कामाबद्दल काय विचार करतात यावर आधारित आहेत."

Google
Google Company : गुगल कंपनीच्या ऑफिसात घातपात करण्याची धमकी; आरोपी हैदराबादेतून अटकेत

शेषाद्री म्हणाले की Google सर्वाधिक फोकस हा रिस्क वर आहे ज्यामुळे अन्य गोष्टी मागे पडतात" कोडची प्रत्येक ओळ, प्रत्येक प्रक्षेपण, अस्पष्ट निर्णय, प्रोटोकॉलमधील बदल आणि मतभेद हे सर्व धोके आहेत. गूगलमध्ये काम करणाऱ्यांना ते व्यवस्थित हाताळावे लागेल.

गेल्या मार्चमध्ये CNBC ने अहवाल दिलेल्या त्याच्या शेवटच्या कर्मचारी-व्यापी सर्वेक्षणात, कर्मचाऱ्यांचा परफॉर्मंस पूअर होता. त्यामुळे कंपनीची नाविन्यपूर्णता कमी झाली आहे असेही ते म्हणालेत.

एकंदरीत गूगलचे वर्क कल्चर सुधारण्याची गरज आहे. शेषाद्री म्हणाले की, गुगलला गोष्टी बदलण्याची संधी आहे, परंतु कंपनी केवळ रिस्क टाळून यशस्वी होऊ शकते असे त्यांना वाटत नाही. गूगलमध्ये काम करणे हे बऱ्याच लोकांचे स्वप्न असले तरी गूगलमध्ये आत काय चालले ते माहिती असणेसुद्धा गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()